व्हिटॅमिन बी-12 हे शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व मानलं जातं. जे आपल्या शरीरातील नसा, रक्तपेशी आणि डीएनएच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन बी-12 हे प्रामुख्याने मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळतं. अन्न पदार्थांतून व्हिटॅमिन बी-12 मिळण्याचं प्रमाण मर्यादित असल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक त्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळतं की नाही हा एक प्रश्नच असतो. याशिवाय शाकाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आढळून येते. त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून व्हिटॅमिन बी-12ची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक आहार घेण्याची गरज आहे.
advertisement
संशोधनात आढळून आली कमतरता
असं नाहीये की, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता ही फक्त भारतीयांमध्येच आहे. जगातल्या प्रत्येक देशातल्या नागरिकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आढळून आलीये. अमेरिकेत विविध वयोगटातल्या विविध नागरिकांवर करण्यात आलेल्या या संशोधनात असं आढळून आलं की, तिथली बहुतांश लोकं व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी पूरक आहार घेत नाहीत. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आढळून आली. मात्र ही लोकं अशी होती ज्यांना कोणते तरी आजार होते किंवा काही ना काही कारणांमुळे ते पोषक आहार घेत नव्हते.
संशोधन आणखी काय सांगतं ?
संशोधनात असं दिसून आलं की, ज्या व्यक्ती त्यांच्या आहारात चिकन, अंडी, गोमांस किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आढळून आली नाही. कारण या सगळ्या अन्नपदार्थांमद्ये व्हिटॅमिन बी-12 नैसर्गिक रित्या चांगल्या प्रमाणात असतं. राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षण अहवालानुसार, 24% पुरुष आणि 29% महिलांना पूरक आहार घेणे आवश्यक होते कारण त्यांच्या शरीरात फोलेट, लोह किंवा व्हिटॅमिन सी सारख्या इतर जीवनसत्त्वांची कमतरता होती. याशिवाय ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आढळून येण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं. त्यामुळे त्यांना डॉक्टांच्या सल्ल्याने पूरक आहार घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिलाय.
व्हिटॅमिन बी-12 कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांच्या काही लक्षणांची माहिती संशोधकांनी दिलीये. त्यामुळे ही लक्षणं जर तुमच्यातही दिसून आली तर समजून जा की तुमच्या शरीरातही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे.
- जास्त श्रमाचं काम न करताही थकवा आणि अशक्तपणा जाणवणं.
- हातपायांना मुंग्या येणं.
- अचानक केस गळायला सुरूवात होणं.
- काविळ झाली नसतानाही त्वचा आणि नखं पिवळ्या रंगाची होणं.
- विसरभोळेपणा वाढणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं.
ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत त्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थां व्यतिरिक्त अन्नातून व्हिटॅमिन बी-12 मिळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी दिलाय.
- पालक, बीटरूट, हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी-12 चांगल्या प्रमाणात आढळून येतं.
- अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया आणि फ्लेक्स सीड्समधूनही व्हिटॅमिन बी-12 मिळू शकतं.