Vitamin B12 Food : शाकाहारी आहात मग खा ‘हे’ पदार्थ ; तब्येत होईल ठणठणीत, राहाल एकदम फिट
- Published by:Tushar Shete
Last Updated:
मासांहारी व्यक्तींना अनेक स्रोतांतून व्हिटॅमिन B12 मिळतं. मात्र शाकाहारी व्यक्तीसांठी व्हिटॅमिन B12 मिळवण्याचे स्रोत फार कमी आहेत.
Benefits of Vitamin B12 आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांपैकी एक म्हणजे जीवनसत्व B12. व्हिटॅमिन बी 12शरीरासाठी एक आवश्यक पोषकतत्व आहे, जे अनेक फायदे देते. हे रक्त आणि मज्जातंतू पेशी निरोगी ठेवण्यासह रक्तक्षय रोखण्यात देखील मदत करतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, डोकेदुखी, त्वचा पिवळी पडणे, हात आणि पायांमध्ये सुन्नपणा, स्मरणशक्ती कमी होणे, चालण्यातील असंतुलन आणि दृष्टीच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
मासांहारी व्यक्तींना अनेक स्रोतांतून व्हिटॅमिन B12 मिळतं. मात्र शाकाहारी व्यक्तीसांठी व्हिटॅमिन B12 मिळवण्याचे स्रोत फार कमी आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या साध्या-साध्या गोष्टीतून शाकाहारी व्यक्ती व्हिटॅमिन B12ची कमतरता भरून काढू शकतात.

फोर्टिफाइड फूड्स
जर तुम्ही शाकाहारी असाल, तर व्हिटॅमिन B12 साठी फोर्टिफाइड पदार्थ हे सर्वोत्तम पर्याय आहेत. ओट्स सारख्या फोर्टिफाइड तृणधान्यांमध्ये जीवनसत्व ब 12, जीवनसत्व अ आणि फोलेट समृद्ध असतात. तुम्ही फोर्टिफाइड बदामाचे दूध देखील पिऊ. एका कप बदामाच्या दुधात सुमारे 2.1 मायक्रोग्राम व्हिटॅमिन B12 असते जो शाकाहारी एक चांगला पर्याय ठरतो.
advertisement

दूध
भारतातील शाकाहारी लोकांसाठी दूध हा व्हिटॅमिन B12चा सर्वात सोपा, पौष्टिक आणि स्वादिष्ट स्रोत आहे. सुमारे 250 मिली गाईचं दूध तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन B12 ची अर्धी गरज पूर्ण करू शकते.

दही
तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा ते पचायला जड जात असेल तर दही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुमारे 70 ग्रॅम कमी फॅटयुक्त दहीसह, आपण आपल्या दैनंदिन व्हिटॅमिन B12 ची 16% गरज भागवू शकतो. अधिक व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी दह्यामध्ये फोर्टिफाइड तृणधान्ये मिसळून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement

पनीर
व्हिटॅमिन B12 साठी पनीर हा आणखी एक उत्तम पर्याय आहे. तो आपल्या दैनंदिन गरजेच्या किमान 20% पर्यंत पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, 100 ग्रॅम चीजमध्ये सुमारे 0.8 मायक्रोग्राम जीवनसत्व बी 12 असते, जे प्रौढांच्या गरजेच्या एक तृतीयांश आहे. दुसरा पर्याय पनीर, विशेषतः स्विस पनीर, ज्यामध्ये 50 ग्रॅममध्ये 1.5 मायक्रोग्राम जीवनसत्व बी 12 असते.
advertisement

शिटाके मशरूम
भारतातील शाकाहारी लोकांसाठी शिटाके मशरूम हा व्हिटॅमिन B12 चा चांगला स्रोत आहे. मात्र त्या फार मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 नसतं, त्यामुळे त्यावर पूर्णपणे अवलंबून राहता नाही येणार. पनीरमध्ये मशरूम मिसळून सलाडही बनवून तुम्ही खाऊ शकता, जी तुमच्या दैनंदिन जीवनसत्व ब 12 ची आवश्यकता पूर्ण करू शकते.
advertisement

व्हे प्रोटीन पावडर
व्हे पावडर केवळ तुमच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करत नाही तर ते थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 देखील देतं. 23 ग्रॅम प्रोटीन पावडरमध्ये आपल्या दैनंदिन गरजेच्या 5% व्हिटॅमिन B12 आढळून येतं. तुम्ही दूध किंवा दहीमध्ये व्हे पावडर मिसळली तर तो व्हिटॅमिन B12चा उत्तम स्रोत बनू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2024 2:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin B12 Food : शाकाहारी आहात मग खा ‘हे’ पदार्थ ; तब्येत होईल ठणठणीत, राहाल एकदम फिट