जुन्या आजाराचा धोका कमी होतो
‘व्हिटॅमीन सी’ हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीराला नैसर्गिकरित्या बळकट करतं. अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. तसंच ते शरीराच्या पेशींचे हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. जेव्हा मुक्त रॅडिकल्स आपल्या शरीरात जमा होतात, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, त्यामुळे विविध रोगांचा धोका वाढतो.
advertisement
ब्लडप्रेशर नियंत्रण
उच्च रक्तदाब किंवा हायब्लडप्रेशर हा आज एक सर्वसामान्य आजार झाला आहे. अमेरिकेतील सुमारे एक तृतीयांश प्रौढांना उच्च रक्तदाब आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. प्राण्यांच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की क जीवनसत्व घेतल्याने हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या पेशींना देखील आराम मिळतो.
हृदयविकाराचा धोका होतो कमी
जगभरात दररोज हजारो लोकं हार्ट ॲटॅकमुळे मृत्युमुखी पडतात. उच्च रक्तदाब, उच्च ट्रायग्लिसराइड किंवा एलडीएल (वाईट) कोलेस्टेरॉलची पातळी आणि एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलची उच्च पातळी यामुळे हृदयाच्या विविध आजारांचा धोका वाढतो. मात्र ‘व्हिटॅमिन सी’ हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवून हृदयविकाराचा झटका किंवा हार्टॲटॅक पासून रोखतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
व्हिटॅमिन सी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. हे आपल्या शरीरात लिम्फोसाइट्स आणि फॅगोसाइट्स म्हणून ओळखल्या जाणार्या पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते, जे शरीराचे संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते.
युरिक ॲसिड कमी करतं
व्हिटॅमिन सी रक्तातील युरिक ॲसिडची पातळी कमी करते. हे संधिवात रोखण्यासाठी प्रभावी ठरतं. सध्या जवळपास 4 टक्के अमेरिकन संधिवाताने आजारी आहेत. संधिवात खूप वेदनादायक असतो ज्यामुळे सांधे पायाच्या बोटांना प्रचंड वेजदना होतात.
लोहाचं प्रमाण सुधारतं
लोह हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे ज्याची शरीरात विविध कार्ये आहेत. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनच्या प्रवाहासाठी हे खूप महत्वाचे आहे. पूरक आहारातून लोहाचे शोषण सुधारण्यास मदत करू शकतात.