व्हिटॅमिन देणारे बेडशीट
आपल्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर चिंता नाही. सहज बेडशीटवर झोपा आणि त्यातून व्हिटॅमिन मिळेल. हे ऐकून नवलच वाटले ना? हो. हे खरे आहे. आज व्हिटॅमिन ई, बी युक्त बांबूपासून तयार केलेले बेडशीटही उपलब्ध आहेत. बेडशीटवर झोपल्यानंतर सहजरित्या व्हिटॅमिन मिळते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी चमकणारे रेडियमचे बेटशीट, झोपल्यानंतर विविध सुवास येतील असे सेंटेड बेडशीट ग्राहकांची पसंतीला उतरत आहे. बेडशीटच्या किमती 300 रुपयांपासून 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
advertisement
दोघा मित्रांनी ठरवलं, सुरू केला खास बिझनेस, आता 35 कामगार अन् कमाई 45 लाख!
पडद्यांची क्रेझ
पूर्वी प्लेन आणि विविध चित्रे असलेले पडदे वापरले जात होते. आता मंदिराच्या खिडक्यांसाठीही पडदे उपलब्ध आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर खिडक्या, दरवाजांचे पडदे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ग्राहक पडदे विकत घेत आहेत. कस्टमाइज्ड पडद्यांची क्रेझ वाढत चालली आहे. त्यामध्ये आकर्षक डिझाइन आणि सहजरित्या उघडतील, बंद होतील आणि विविध रंगाच्या पडद्यांना मागणी आहे.
रिमोट सेंसरवरचे पडदे
आता बाजारात रिमोट कंट्रोलवर चालणारे पडते आले आहेत. ते घर, ऑफिस, कंपन्यामध्ये वापरले जातात. त्यासोबत सिलिंगला लावण्यासाठीही पडदे आहेत. पूर्वी प्लेन, फ्लॉवर्सच्या जागी वेस्टर्न स्टाइल दिसतील, असे पडदे आले आहेत. ऑफिससाठी ब्लाइंड, वूडन, झेब्रा पडदे अशा विविध प्रकारचे पडदे उपलब्ध असल्याचंही विक्रेते सांगतात.