गंभीर आरोग्य समस्या टाळण्यासाठी शरीर देत असलेले संकेत समजणं गरजेचं आहे. लोकांना अनेकदा या लक्षणांची जाणीव नसते आणि पौष्टिक कमतरता बऱ्याचदा खूप उशिरा आढळून येतात. जाणून घेऊया कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेनं कुठला त्रास जाणवू शकतो.
Cancer : शरीरातले सूक्ष्म बदल देतात कर्करोगाचे संकेत, ही माहिती नक्की वाचा
व्हिटॅमिन डी ला "सनशाईन व्हिटॅमिन" म्हणून ओळखलं जातं आणि ते आपल्या मूड आणि उर्जेच्या पातळीसाठी महत्वाचं आहे. हाडांचं दुखणं हे कमतरतेचं पहिले लक्षण आहे असं मानलं जातं पण ते पूर्णपणे खरं नाही. जेव्हा व्हिटॅमिन डीची कमतरता होते, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला अकारण दुःख, चिडचिड किंवा नैराश्य जाणवू शकतं. कारण व्हिटॅमिन डी मेंदूच्या सेरोटोनिन हार्मोनच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतं.
advertisement
मॅग्नेशियमची कमतरता - स्नायूंमधे पेटके येणे हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. पण त्याही आधी जाणवणारं पहिलं लक्षण म्हणजे निद्रानाश किंवा चिंता. मॅग्नेशियमची कमतरता थेट झोप आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. अकारण चिंता वाटत असेल किंवा झोपेचा त्रास होत असेल, तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं एक महत्त्वाचे लक्षण असू शकतं.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता - व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पहिली आणि सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे शरीरात ऑक्सिजनच्या वाहतुकीच्या कमतरतेमुळे वाढलेला थकवा आणि अशक्तपणा. हात आणि पायांत मुंग्या येणं किंवा सुन्न होणं हे देखील मज्जातंतूंच्या नुकसानाचं लक्षण असू शकतं.
Immunity : हिवाळ्यात अशी घ्या काळजी, घरी बनवून ठेवा हा रस, जाणून घ्या फायदे
पोटॅशियमची कमतरता - पोटॅशियम हे एक इलेक्ट्रोलाइट आहे. हृदयाचे ठोके, स्नायूंचं आकुंचन आणि मज्जातंतूंच्या सिग्नल ट्रान्समिशनचं नियमन करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. पोटॅशियमची पातळी कमी होते तेव्हा त्याचा थेट आपल्या हृदयावर परिणाम होतो. हृदयाची धडधड वाढणं, हृदयाचे ठोके जलद येणं, हृदयाचे ठोके चुकणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित येणं ही कमतरता आहे याचा इशारा देणारी लक्षणं आहेत.
ओमेगा-3 फॅटी एसिडची कमतरता - मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी ओमेगा-३ फॅटी एसिड महत्वाचं आहे. ओमेगा-3 च्या कमतरतेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, स्मरणशक्ती कमी होणं आणि चिडचिड होणं ही पहिली लक्षणं दिसतात.
