कॉफी हा एक नैसर्गिक पदार्थ असून तो केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान करत नाही. याउलट ते केसांना अँटीऑक्सिडेन्ट्स पुरवते. यामुळे केसांना शाइनही मिळते. जर तुम्ही या मास्कचा वापर हेअर मास्क म्हणून करत असाल तर तुम्हाला सलॉनसारखे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. मात्र हा मास्क योग्य पद्धतीने बनवणे अतिशय आवश्यक आहे. हा मास्क कसा बनवायचा जाणून घ्या.
advertisement
Brain Tumour झाल्यास शरीर देतं संकेत; ही लक्षणं जाणवत असतील तर करू नका दुर्लक्ष
सामग्री:
चार चमचे कॉफी, एक ग्लास पाणी, दोन चमचे कोको पावडर, दोन चमचे कॉर्न स्टार्च, दोन चमचे दही, एक चमचा व्हिनेगर
मास्क बनवण्याची कृती:
- एका पॅनमध्ये दोन चमचे कॉफी घेऊन त्यात पाणी टाकावे. हे मिश्रण दोन मिनिटे उकळावे. मिश्रण थंड झाल्यावर ते गाळून घ्यावे.
- आता दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे कॉफी घेऊन कोको पावडर आणि दोन चमचे कॉर्न स्टार्च टाकून मिश्रण उकळून घ्यावे. या मिश्रणात आधीचे कॉफी मिश्रण टाकून नीट एकजीव करावे.
18 की 80, कोणत्या वयातील महिला असतात सर्वांत उत्साही? 99% पुरूषांना माहित नाही उत्तर
- आता हे मिश्रण मंद आचेवर गरम करावे. मिश्रण घट्ट झाल्यावर ते थंड होऊ द्यावे.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात दोन चमचे दही घालून एकजीव करावे. त्यात एक चमचा व्हिनेगर टाकून मिसळ्यावर तुमचा कॉफी मास्क तयार आहे.
- हा मास्क केसांना नीट लावून एक तास ठेवावा. यानंतर तो पाण्याने धुवून टाकावा. यामुळे तुमचे केस ब्राऊन आणि मुलायम होतील.