प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात तेलाचा वापर केला जातो, पण बाजारात भेसळयुक्त तेलही उपलब्ध आहे, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे लक्षात घेऊन, अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त तेल ओळखण्यासाठी सोपे घरगुती उपाय सुचवले आहेत.
विभागाचे अधिकारी डोमेनरा ध्रुव यांच्या म्हणण्यानुसार, तेलातील मेण किंवा इतर भेसळ तपासण्यासाठी तेल काही काळ फ्रीजमध्ये ठेवा. तेल घट्ट होऊन वेगवेगळ्या थरांमध्ये विभागले गेले, तर ते भेसळयुक्त आहे, तर एकसमान थर असल्यास तेल शुद्ध मानले जाईल.
advertisement
अशी तपासा तेलाची शुद्धता : बाजारात भेसळयुक्त तेल ओळखणे कठीण असले, तरी काही सोप्या घरगुती उपायांनी त्याची शुद्धता तपासता येते.
मोहरीचे तेल तपासणे : तेलाचा डबा काही काळ फ्रीजमध्ये ठेवा. तेलाच्या तळाशी पांढरा थर तयार झाल्यास, त्यात पामतेल मिसळले आहे. शुद्ध मोहरीचे तेल थंड हवामानातही द्रव राहते.
रंग तपासणे : थोडं तेल तुमच्या हात किंवा पायावर चोळा. त्याने रंग सोडला, तर त्यात रंग मिसळला आहे. शुद्ध मोहरीचे तेल कोणताही रंग सोडत नाही.
वास ओळखणे : शुद्ध मोहरीच्या तेलाला उग्र वास येतो आणि गरम केल्यावर डोळ्यांना थोडी जळजळ होते. भेसळयुक्त तेलात हा परिणाम दिसत नाही.
या घरगुती उपायांनी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले भेसळयुक्त तेल सहज ओळखू शकता आणि तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकता.
हे ही वाचा : ॲसिडिटीचा त्रास होईल दूर, दररोज ताक पिण्याचे शरीराला फायदेच फायदे, पण प्यावं किती?
हे ही वाचा : फ्रिजमधून येणाऱ्या दुर्गंधीने हैराण आहात? 'हे' सोपे घरगुती उपाय करा, काही मिनिटांत स्वच्छ होईल फ्रिज!