TRENDING:

Water Diya : मातीच्या पणत्या पाण्याने कशा पेटवायच्या? पाण्यावर चालणाऱ्या सेन्सर दिव्यांपेक्षाही भारी जुगाड

Last Updated:

Water Diya Video : पाण्यावर पेटणाऱ्या मातीच्या पणत्या बनवून दाखवल्या आहेत एका गृहिणीने. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुम्ही आता बाजारात गेलात तर तुम्हाला पाण्यावर पेटणारे दिवे दिसतील. पाणी टाकताच पेटणारे हे दिवे जे सेन्सरवर चालतात. पाण्यावर पेटणारे दिवे बाजारात मिळतील पण ते आर्टिफिशिअल असतात. त्यात सेन्सर आणि लाइट असते.  ज्यामुळे पाणी टाकताच या सेन्सरमुळे लाइट पेटते. पण मातीची पणती आणि कापसाची वात हे पारंपरिक पद्धतीचे दिवेही तुम्ही पाण्यावर पेटवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? हे दिवे तुम्ही घरीच तयार करू शकता.  पाण्यावर पेटणाऱ्या मातीच्या पणत्या बनवून दाखवल्या आहेत एका गृहिणीने. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

दिवाळी म्हटलं की पणत्यांची आरास आलीच. पण पणत्यांना तेलही तितकंच लागतं. पण आता तुम्ही पाण्यावरही दिवे पेटवू शकता. बाजारात मिळणाऱ्या सेन्सर दिव्यांपेक्षाही भारी अशा मातीच्या पणत्या तुम्ही पाण्यावर पेटवू शकता. आता मातीच्या पणत्या पाण्यावर कशा पेटवायच्या हे एका गृहिणीने दाखवलं आहे.

Jugaad Video : दिवाळीची एक पणती टॉयलेटमध्येही! बाथरूममध्ये दिवा आणि चमत्कार पाहा

advertisement

सगळ्यात आधी तुम्ही मातीचे दिवे नवीन घेतले असतील तर एक तासभर किंवा किमान 15 मिनिटं तरी ते पाण्यात बुडवून ठेवा आणि सुकवून घ्या. आता कापसाच्या वाती करून घ्या. वाती बनवताना हाताला दूध किंवा थोडं पाणी लावा यामुळे वात घट्ट बनते. वात जितकी घट्ट तितकी वाती चांगली आणि बराच वेळ पेटत राहते.

advertisement

आता पणत्यांमध्ये पाणी भरा. पाणी पणत्यांमध्ये पूर्ण भरायचं नाही. वर थोडी जागा मोकळी ठेवा. या पणत्यांमध्ये फक्त एक चमचा तेल टाका. आता तयार केलेल्या वाती तेलात बुडवून घ्या आणि पणतीत जिथं तेल आहे त्यात वाती ठेवा. वाती ठेवताना लक्षात ठेवा की वातीचं मागील टोक त्या तेलात बुडायला हवं आणि पुढील टोक पाण्यात बुडू देऊ नका. ते पणतीच्या टोकावर ठेवा. टेराकोटाच्या पणत्याही तुम्ही अशा पद्धतीने पेटवू शकता.

advertisement

Kapur : पूजेत वापरता तो कापूर कशापासून बनवतात तो माहितीये? तो पेटतो कसा काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पणत्यांमधून टिक-टिक असा आवाज आला तर त्या पणतीत थोडं पाणी चमचाभर तेल पुन्हा टाका. एक चमचा तेलात पणत्या एक-दीड तास आणि दोन चमचे तेलात अडीच-तीन तास पेटत राहतील असा दावा या महिलेने केला आहे. कमीत कमी तेलात पाण्यावर चालणारे हे दिवे तुम्हीही बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भावना कुकिंग वर्ल्ड युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Water Diya : मातीच्या पणत्या पाण्याने कशा पेटवायच्या? पाण्यावर चालणाऱ्या सेन्सर दिव्यांपेक्षाही भारी जुगाड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल