Jugaad Video : दिवाळीची एक पणती टॉयलेटमध्येही! बाथरूममध्ये दिवा आणि चमत्कार पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diya in Toilet : एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. टॉयलेटमध्ये पणती लावल्याने मोठ्या त्रासातून सुटका होईल. एकदा याचा परिणाम तुम्ही पाहाल तर हा उपाय नेहमी कराल.
नवी दिल्ली : दिवाळी म्हणजे पणत्यांची किंवा दिव्यांची आरास. पणती आपण देव्हाऱ्यात, उंबरठ्यावर, अंगणात लावतो. पण तुम्ही कधी टॉयलेटमध्ये पणती लावून पाहिली आहे का? टॉयलेटमध्ये पणती लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. टॉयलेटमध्ये पणती लावल्याने मोठ्या त्रासातून सुटका होईल. एकदा याचा परिणाम तुम्ही पाहाल तर हा उपाय नेहमी कराल.
दिवाळी म्हणून तुम्ही नवीन पणत्या घेतल्या असतील. गेल्या वर्षीच्या दिवाळीतील वापरलेल्या जुन्या पणत्या आता तुमच्याकडे पडलेल्या असतील. त्या फेकून देण्याचा विचार असेल किंवा त्याचं काय करायचं असा प्रश्न असेल तर तुम्ही त्या पणत्या टॉयलेटमध्ये वापरू शकता. आता टॉयलेटमध्ये पणती लावण्याचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग हा व्हिडीओ पाहुयात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने आधी एका भांड्यात कपड्यांची पावडर घेतली. त्यात खायचा सोडा टाकला आणि त्यात अर्धा लिंबू पिळला. त्यानंतर तिनं ते मिश्रण हातांनीच नीट मिक्स करून घेतलं. त्यानंतर एक पणती घेतली आणि या पणतीत हे मिश्रण दाबून दाबून भरलं. पणती पूर्णपणे एका प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळली. या पिशवीला एक दोरा बांधला. त्यानंतर पणतीच्या वर प्लॅस्टिकला छिद्रं पाडली.
advertisement
आता याचं करायचं काय तर ही पणती तुम्हाला तुमच्या टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये लावून ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा पणतीच्या प्लॅस्टिकवर असेलल्या छिद्रातील मिश्रण पाण्यात जाईल आणि त्या पाण्यानं तुमचं टॉयलेट स्वच्छ होईल. म्हणजे हा तुमचा घरगुती टॉयलेट क्लिनर तयार झाला. त्यामुळे बाजारातील टॉयलेट क्लिनरवर पैसे वाया घालवण्याची गरज नाही. शिवाय पुन्हा पुन्हा टॉयलेट स्वच्छ करण्याच्या त्रासातूनही सुटका होईल.
advertisement
Avika rawat foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 19, 2025 1:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : दिवाळीची एक पणती टॉयलेटमध्येही! बाथरूममध्ये दिवा आणि चमत्कार पाहा