जबड्याला धोका कसा ?
आपल्याला आठवत असेल लहानपणी जेव्हा आपला एखादा दात तुटायाचा किंवा लहान मुलांचे दुधाचे दात पडल्यानंतर आपले आई-वडिल आपल्याला किंवा आपण लहान मुलांना दात नसलेल्या जागी सतत जीभ न लावयाचा सल्ला द्यायचो. कारण काय तर ? जीभ लावल्यामुळे दात पुढे सरकून दातांची ठेवण बिघडेल आणि जबड्याचा आकार बदलेल.
advertisement
अभ्यासात काय आढळलं ?
संशोधकांनी 3 ते 5 वयोगटातील मुलांचं परीक्षण केल्यावर त्यांना असं आढळून आलं की, प्रोसेस्ड फूडपेक्षा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे खाताना ते जास्त चावलं किंवा चघळलं जात नाही. कारण या पदार्थांना भाज्या आणि किंवा अन्य पोषक आहारांपेक्षा फारच कमी चघळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जबड्याचे स्नायू योग्य प्रकारे वापरले जात नाहीत. आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, एक घास 32 वेळा चावून खायचा. याचे 2 फायदे होतात. एक तर अन्नाचे बारीक तुकडे होऊन ते लवकच पचतं. त्यामुळे पचनक्रियेवर ताण येत नाही. शिवाय जेव्हा एक घास जास्त वेळा चावून, चघळून खाल्ला जातो तेव्हा चेहऱ्याची हाडं आणि स्नायूं कार्यान्वित राहतात. ज्यामुळे दातांची आणि जबड्याची ठेवण नीट राहते. मात्र अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये अन्न जास्त चावलं आणि चघळलं जात नाही त्यामुळे दातांच्या आणि जबड्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
फळं, भाज्या किंवा नैसर्गिक प्रथिनं असलेले पदार्थ खाणं हे निरोगी जबड्याच्या विकासासाठी आवश्यक आहे. या पदार्थांमुळे दातांचं आरोग्य चांगलं तर राहतंच मात्र त्याचसोबत दातांची ठेवणही चांगली राहून जबड्याचा आकार सुधारतो.