Dental Tips for Winter: हिवाळ्यात ‘अशी’ घ्या दातांची काळजी; अन्यथा दातदुखीमुळे करावी लागेल ‘बोंबाबोंब’

Last Updated:

Excerpt Oral & Dental Tips for Winters: थंडीत आपण आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो त्याच पद्धतीने तंदुरुस्त राहण्यासाठी दातांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहेत. अन्यथा दातदुखीमुळे आजारांना निमंत्रण मिळेल.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘अशी’ घ्या दातांची काळजी; अन्यथा दातदुखीमुळे करावी लागेल ‘बोंबाबोंब’
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘अशी’ घ्या दातांची काळजी; अन्यथा दातदुखीमुळे करावी लागेल ‘बोंबाबोंब’
मुंबई : हिवाळ्यात वाढलेल्या प्रदुषणामुळे आणि गारव्यामुळे अनेकांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे साथीचे आजार होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. थंडीत आपण आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो पण दातांचं काय? दात हा आपल्या शरीरातला महत्वाचा भाग. असं म्हणतात आपलं संपूर्ण आरोग्य हे दातांवर अवलंबून असतं. कारण जर दात चांगले नसतील तर नीट खाता येणार नाही. नीट खाल्लं नाही तर आवश्यक ती पोषकतत्त्वे शरीराला मिळणार नाहीत. जरी खाता आलं तरी खाल्लेलं अन्न पचणार नाही. त्यामुळे दातांची विशेष काळजी ही आपल्याला नेहमीच घ्यावी लागते. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला दातांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहेत. पाहुयात, हिवाळ्यात दातांची काळजी घेण्याच्या काही टीप्स्.  
हिवाळ्यात वाढलेल्या प्रदुषणामुळे आणि गारव्यामुळे अनेकांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. मुळातच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे साथीचे आजार होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. थंडीत आपण आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो पण दातांचं काय? दात हा आपल्या शरीरातला महत्वाचा भाग. असं म्हणतात आपलं संपूर्ण आरोग्य हे दातांवर अवलंबून असतं. कारण जर दात चांगले नसतील तर नीट खाता येणार नाही. नीट खाल्लं नाही तर आवश्यक ती पोषकतत्त्वे शरीराला मिळणार नाहीत. जरी खाता आलं तरी खाल्लेलं अन्न पचणार नाही. त्यामुळे दातांची विशेष काळजी ही आपल्याला नेहमीच घ्यावी लागते. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला दातांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहेत. पाहुयात, हिवाळ्यात दातांची काळजी घेण्याच्या काही टीप्स्.  

थंडीपासून बचाव

advertisement
थंड हवामानामुळे दातांमध्ये संवेदनशीलता वाढू शकते आणि दातांना वळ येणं काही खाल्लं किंवा प्यायल्या नंतर ठणका लागणे अशा विविध उद्भवू शकतात. शरीराला थंडी वाजू नये म्हणून आपण जसं स्वेटर किंवा उबदार कपडे घालतो तसंच दातांना थंडी वाजू नये म्हणून स्कार्फ किंवा मफलरचा वापर करून तोंडावर थंड वारा येणं टाळा.

2वेळा ब्रश करा

advertisement
त्यामुळे हिवाळ्यात दात स्वच्छ ठेवण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश करावा. हिवाळ्यात हिरड्यांना इजा होऊ नये म्हणून मऊ ब्रिसल्सचा ब्रश वापरावा.

थंड आणि गरम पदार्थांवर नियंत्रण

हिवाळ्यात थंड किंवा गरम पदार्थांचा दातांवर थेट परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे अती थंड किंवा अती गरम पदार्थ खाण्याचा मोह टाळावा जेणेकरून दातांची संवेदनशीलता नियंत्रणात राहील आणि दातदुखीचा त्रास होणार नाही.
advertisement

गुळण्या

कोमट पाण्यात हळद व मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे दात व हिरड्यांचे दुखणे कमी होते. जर दात दुखत असतील तर दुखऱ्या दातावर लवंग तेल लावल्याने वेदना कमी होतात.याशिवाय तुळशीची पाने चघळल्याने तोंडातील जंतू नष्ट होतात.

आहारात बदल

आहारात दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.यात असलेल्या व्हिटॅमिन डी मुळे हाडं आणि दात मजबूत व्हायला मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dental Tips for Winter: हिवाळ्यात ‘अशी’ घ्या दातांची काळजी; अन्यथा दातदुखीमुळे करावी लागेल ‘बोंबाबोंब’
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement