स्टिकर्स आणि आरोग्याचा संबंध ?
दुनेजा यांनी न्यूज18 ला सांगितलं की, फळांवर स्टिकर लावून विक्री करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. मात्र हे स्टिकर्स 2 प्रकारचे आहेत. काही स्टिकर्स हे फक्त बेस्ट क्वॉलिटी असं लिहिलेले असतात. परंतु या स्टिकर्सचा आरोग्याशी काहीही संबंध नाही. विदेशातून आयात केल्या गेलेल्या फळांवर फळांची किंमत आणि त्याची एक्सपायरी डेट आणि पीएलयू कोड असतो. हा कोड फळाची गुणवत्ता आणि फळ कसं वाढवले गेलं आहे ते दर्शवितो.
advertisement
स्टिकर्सवरच्या कोडचा चा अर्थ काय?
4 ने सुरू होणारा कोड : आहारतज्ज्ञांनी सांगितले की काही सफरचंद किंवा इतर फळांवर चार-अंकी क्रमांक लिहिलेला असतो, जसे की 4026, 4978. याचा अर्थ असा की ही फळे कीटकनाशकं आणि रसायने वापरून पिकवली गेली आहेत. यामध्ये कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.
8 ने सुरू होणारा कोड: काही फळांच्या स्टिकर्सवर 5 ने सुरू होणारा ५-अंकी क्रमांक असतो. उदा. 84131, 86532 याचा अर्थ असा की, या फळांमध्ये कीटकनाशकांचा वापर कमी असू शकतो.
9 ने सुरू होणारा कोड : काही फळांवर 9 ने सुरू होणारा पाच-अंकी कोड असतो, जसं की 93435 याचा अर्थ असा की ही फळं सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत आणि त्यामध्ये कोणतंही कीटकनाशक वापरलेले नाहीत. या फळांची किंमत इतर फळांपेक्षा जास्त आहे.
मात्र अनेक वेळा फळांवर बनावट स्टिकर्स लावले जातात. काही फळांवर तर फक्त ज्यावर बेस्ट क्वालिटी आणि प्रीमियम क्वालिटी लिहिलेले असते आणि त्यांना काही अर्थ नसतो. त्यामुळे असे स्टिकर पाहून फळं खरेदी करण्यापेक्षा आधी ती फळं नीट तपासून घ्या. तुम्हाला की चांगली वाटली तरच ती विकत घ्या. फळं खरेदी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासा. त्यावर लावलेलं स्टिकर ही एक धूळफेक असू शकते.