वजन कमी होणे : जर तुम्ही 21 दिवस गोड खात नसाल तर लठ्ठपणा कमी होऊन तुमचं वजन देखील कमी होऊ शकतं. गोड पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
ग्लोइंग स्किन : गोड न खाल्ल्याने त्वचा खूप हेल्दी आणि ग्लोइंग बनते. जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा तुमच्या शरीरातील साखर कोलेजन प्रोटीनला चिकटून राहते आणि हळूहळू कोलेजन नष्ट होऊ लागते. कोलेजन कमी झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होते आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
advertisement
Knee Pain : ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम, फक्त 'हा' उपाय करा
दात होतील मजबूत : जर तुम्ही 21 दिवस गोड खाल्लं नाहीत तर तुमचे दात सुद्धा मजबूत होतील. जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा तोंडात असणारे बॅक्टेरिया आणि साखर मिळवून ऍसिड बनते. ज्यामुळे दात सडतात. ज्यामुळे दातांमध्ये कॅविटी निर्माण होते.
हार्ट अटॅक : गोड खाण टाळल्याने हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होतात. गोड खाल्ल्याने ट्राइग्लिसराइड लेव्हल वाढते आणि ज्यामुळे रक्त गोठू लागत ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)