TRENDING:

Orange Benefits : संत्री खाण्याचीही असते योग्य वेळ! तज्ज्ञांनी सांगितलेली पद्धत फॉलो करा, मिळतील दुप्पट फायदे!

Last Updated:

Best time to eat orange according to doctor : डॉ. राजकुमार यांनी सांगितलं की, संत्री योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ली, तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात रसाळ फळं खाण्याकडे सर्वांचा कल असतो. कारण यामुळे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. आपण कलिंगड, खरबूज, शहाळं, किवी, द्राक्ष, संत्री अशी अनेक फळं उन्हाळ्यात आवर्जून खातो. यातीलच संत्रीबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्हाला माहितीये संत्री खाण्याची विशिष्ट वेळ आणि प्रमाण असते.
संत्री खाण्याची योग्य वेळ
संत्री खाण्याची योग्य वेळ
advertisement

संत्री योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ली तर तिचे आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. मात्र जर आपण संत्री चुकीच्यावेळी किंवा चुकीच्या प्रमाणात खाल्ली तर त्याचे पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाहीत. डॉ. राजकुमार यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं की, संत्री योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ली, तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढू शकतात.

advertisement

काय आहे संत्री खाण्याची योग्य वेळ?

डॉ. राजकुमार यांच्यामते, संत्री खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळ किंवा दुपारची आहे. तुम्ही नाश्त्यानंतर किंवा दुपारी संत्री खाऊ शकता. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. संत्र्यामधील व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि त्वचेसाठीही फायदेशीर असते. यावेळी संत्री खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलकं वाटतं.

संत्री खाण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची..

advertisement

बऱ्याच जणांना संत्र्याचा ज्यूस प्यायला जास्त आवडतं. पण संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर असतं. संपूर्ण संत्री खाल्ल्याने शरीराला फायबर मिळतं, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. ज्यूसमध्ये फायबर जास्त नसते. म्हणून संपूर्ण पोषणासाठी संत्र्याची साल काढून ते थेट खाणंच उत्तम आहे.

संत्री खाणच योग्य प्रमाण..

तुम्ही दिवसातून एक ते दोन संत्री खाऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. जास्त संत्री खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. म्हणून संत्री प्रमाणात खा. योग्य प्रमाणात खाल्ल्याने शरीराला पूर्ण लाभ मिळतो.

advertisement

संत्री खाण्याचे फायदे..

संत्री खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संत्र्यामधील व्हिटॅमिन सी सर्दी आणि फ्लू टाळण्यास मदत करते. संत्री त्वचा उजळवण्यासाठीही मदत करते. जे लोक नियमितपणे संत्री खातात, त्यांची त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार दिसते. संत्री शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते.

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही संत्री एक चांगला पर्याय आहे. त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रणातही मदत होते.

advertisement

काही लोकांनी मात्र संत्री खाऊ नये किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ती खावी. ज्यांना आम्लपित्ताचा किंवा गॅसचा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी संत्री खाऊ नका. रात्री संत्री खाल्ल्याने काही लोकांना पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे संत्री नेहमी दिवसा आणि प्रमाणात खा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Orange Benefits : संत्री खाण्याचीही असते योग्य वेळ! तज्ज्ञांनी सांगितलेली पद्धत फॉलो करा, मिळतील दुप्पट फायदे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल