लेझी आय म्हणजे काय?
लेझी आय म्हणजे डोळा पूर्णपणे निरोगी असतानाही मेंदू त्या डोळ्यापासून आलेली इमेज (प्रतिमा) नीट स्वीकारत नाही. दोन्ही डोळे एकत्र काम करत नाहीत, आणि त्यातील एक डोळा “कमजोर” होतो. त्यामुळे दिसणारी प्रतिमा अस्पष्ट, धूसर किंवा डबल दिसू शकते.
यामध्ये दोष डोळ्याच्या रचनेत नसतो, तर डोळा आणि मेंदू यांच्यातील समन्वयात असतो. म्हणूनच याला “आय प्रॉब्लेम” पेक्षा “ब्रेन-आय कनेक्शन प्रॉब्लेम” म्हणतात.
advertisement
लेझी आय का होतो? प्रमुख कारणं
डोळ्यांची नंबरची समस्या (Refractive Error). एक डोळ्याचा नंबर जास्त आणि दुसऱ्याचा कमी असल्यास मेंदू कमी नंबराच्या डोळ्याला प्राधान्य देतो आणि दुसरा डोळा वापरात कमी येतो.
स्क्विंट (भेंगडेपणा)
डोळे एकाच दिशेला न पाहिल्याने मेंदू भ्रम टाळण्यासाठी एक डोळा "ignore" करतो.
जन्मजात समस्या
जसे कॅटॅरॅक्ट, पापणी जड असणे किंवा जन्मजात डोळे झाकले जाणे.
सतत जवळून स्क्रीन पाहिल्याने डोळ्यावर ताण येतो आणि एका डोळ्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
लेझी आय कसं काम करतं?
सामान्यतः दोन्ही डोळे एकत्र पाहतात आणि मेंदू त्या दोन प्रतिमा एकत्र करून स्पष्ट चित्र तयार करतो. पण लेझी आयमध्ये एक डोळा स्पष्ट इमेज पाठवतो, दुसरा अस्पष्ट इमेज पाठवतो. मेंदू गोंधळ टाळण्यासाठी अस्पष्ट इमेज "ignore" करतो. त्यामुळे त्या डोळ्याचे कामकाज कमी होते
हळूहळू तो डोळा “लेझी” होतो
यामुळे डेप्थ परसेप्शन, म्हणजे अंतर मोजण्याची क्षमता कमी होते आणि स्पोर्ट्स किंवा अभ्यासात लक्षात येण्याजोगे बदल दिसतात.
याची लक्षणं पहिल्याच टप्प्यात ओळखा
जवळची किंवा दूरची अक्षरं अस्पष्ट दिसणं, एक डोळ्यावर जास्त अवलंबून राहणं, डोळे नीट सरळ न दिसणे, टिल्ट करून किंवा एका बाजूला डोकं वळवून पाहणं, खेळताना चेंडू पकडण्यात अडचण
लेझी आय उपचार
चांगली गोष्ट म्हणजे लेझी आय लवकर शोधल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो.
स्पेक्टॅकल्स (नंबरचा चष्मा)
दोन्ही डोळ्यांची दृष्टी समान केली जाते.
निरोगी डोळा काही वेळासाठी झाकला जातो, जेणेकरून कमजोर डोळा “काम” करायला भाग पडतो.
विशेष व्यायामाद्वारे मेंदू-डोळा समन्वय सुधारला जातो.
लेझी आय ही दुर्लक्षित होणारी पण उपचाराने सुधारू शकणारी समस्या आहे. मुलांचे डोळे 6-7 वयापर्यंत झपाट्याने विकसित होतात, त्यामुळे लवकर निदान हेच सर्वात प्रभावी औषध आहे. वेळेवर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास मुलांची दृष्टी 100% सामान्य होऊ शकते.
