पांढरं अंड आणि तपकिरी अंड्यात फरक काय ?
स्वस्त आणि बहुमूल्स प्रोटिन्सचा खजीना असं अंड्याचं वर्णन करता येईल. दोन्ही अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स आढळून येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर बॉलयर म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या कोंबड्यापासून पांढरी किंवा इंग्लिश अंडी मिळतात, तर रंगीबेरंगी, गावठी कोंबड्यांपासून तपकिरी अंडी मिळतात.
advertisement
कोणत्या अंड्यात जास्त पोषकतत्त्वं ?
काही लोकांना वाटतं की तपकिरी किंवा अंडी जास्त पौष्टिक असतात, पण हे पूर्ण सत्य नाही. अंड्यातली पोषकतत्वे ही अंड्यांच्या रंगांवर नाही तर कोंबड्यांच्या आहारावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जर कोंबड्यांच्या आहारात जास्त गवत, जवस इत्यादी असतील तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या अंड्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि अँटिऑक्सिडंट्स देखील जास्त असतील. हा नियम तपकिरी आणि पांढऱ्या दोन्ही अंड्यांना लागू होईल. मात्र आपल्याला माहिती आहे की, पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना नैसर्गिक खाद्य कमी प्रमाणात मिळतं. याशिवाय त्यांची लवकर वाढ होण्यासाठी त्यांना इंजेक्शन्सुद्धा दिले जातात. त्यामुळे गावठी अंड्याच्या तुलनेत इंग्लिश अंड्यामध्ये कमी पोषकतत्वं असतात. यामुळेच तपकिरी अंड्यापेक्षा पांढरी अंडी ही किमतीने स्वस्तसुद्धा असतात.
हे सुद्धा वाचा : benefits of eating Eggs in : दिवसाला किती अंडी खाणं फायद्याचं ?
एका अंड्यामध्ये किती पोषक तत्वे ?
सर्वसाधारणपणे एका अंड्यात मग ते पांढरं अंड असो की तपकिरी अंड त्यात 70-75 कॅलरीज 6 ग्रॅम प्रथिने आणि 5 ग्रॅम चरबी असते. याशिवाय त्यात 1.5 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आणि 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळते.
अंड्यांचा अतिरेक टाळा
‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.’ हे वाक्य अंड्याच्या बाबतीत तंतोतंत लागू ठरतं. दररोज एक अंड खाणं हे आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचं ठरू शकतं. मात्र तुम्ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात अंड्याचं सेवन करत असाल तर तुम्हाला संभाव्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असेलल्या रूग्णांनी जास्त अंडी खाऊ नयेत. याशिवा ज्यांना डायबिटीस, किडनीचे आजार आहेत अशा व्यक्तींनी अंड्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अंड्याचं सेवन नियंत्रित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं हे केव्हाही फायद्याचं ठरू शकतं.