भारतात मात्र चित्र वेगळं आहे. येथे दारू पिणं म्हणजे एक "सोशल फंक्शन" पार्टी किंवा दावत असते. अशा प्रसंगी जेवण हा महत्वाचा भाग मानला जातो. लोक व्हिस्की, रम किंवा बीअर घेतात आणि सोबत 'चखना' किंवा भरपूर स्नॅक्स असणं आवश्यक समजलं जातं. कारण भारतीय दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं आणि रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे लोक जास्त खातात.
advertisement
शरीर आणि दारूचं नातं
दारू पिल्यानंतर अनेकांना नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. हे फक्त भारतातच नाही, तर जगभरातील लोक अनुभवतात. यामागे वैज्ञानिक कारणं आहेत.
दारू आपल्या मेंदूतील हायपोथॅलेमस या भागावर परिणाम करते. हा भाग भूक, तापमान आणि इतर महत्वाच्या क्रिया नियंत्रित करतो. 2017 मधील एका रिसर्चनुसार दारू प्यायल्यानंतर AgRP न्युरॉन्स सक्रिय होतात, जे मेंदूला भूक लागल्याचा सिग्नल देतात.
स्वाद आणि सुगंध अधिक जाणवणे
दारू प्यायल्यानंतर आपल्या चवीची आणि वास घेण्याची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे खाणं अधिक चविष्ट वाटतं आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो.
ब्लड शुगर कमी होणे
अल्कोहोल शरीरातील ब्लड शुगरची पातळी कमी करू शकतं. अशा वेळी शरीराला उर्जा हवी असते आणि ब्रेन लगेच खाण्याचा सिग्नल देतो. म्हणून गोड, खारट किंवा जास्त कॅलरीचं खाणं आपल्याला आकर्षित करतं.
सेल्फ-कंट्रोल कमी होणं
दारू पिल्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःवरचा कंट्रोल कमी होतो. त्यामुळे आपण किती खावं किंवा काय खावं यावर नियंत्रण राहत नाही. परिणामी जास्त तेलकट, तळलेले किंवा जंक फूड खाल्लं जातं.
काय सांगतं संशोधन?
2017 च्या नेचर कम्युनिकेशन या स्टडीमध्ये दाखवण्यात आलं की दारू प्यायल्यानंतर AgRP न्युरॉन्स अॅक्टिव्ह होतात आणि भुकेचा सिग्नल देतात.
2015 च्या दुसऱ्या स्टडीमध्ये आढळलं की दारू पिल्यानंतर लोक जास्त कॅलरीचं, विशेषतः खारट आणि फॅटी फूड खातात.
दारू प्यायल्यानंतर भूक लागणं किंवा जास्त खाण्याची इच्छा होणं हा शरीराचा नैसर्गिक रिअॅक्शन आहे. पुढच्या वेळी तुम्हाला असं वाटलं तर लक्षात ठेवा यात तुमची चूक नाही, तर तुमच्या मेंदू आणि शरीराचं विज्ञान काम करतंय.