TRENDING:

Perfume : मानेवर परफ्युम स्प्रे का नाही करायचं ? त्वचेच्या, हार्मोनल समस्या होतील सुरु, वाचा सविस्तर माहिती

Last Updated:

मानेवर किंवा घशावर परफ्युम स्प्रे करणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. परफ्युम लावल्यानं दीर्घकाळात मोठ्या हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. आहार तज्ज्ञ डॉ. क्रिस्टेबेल अकिनोला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. त्यात मानेवर स्प्रे करणं का हानिकारक आहे याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्हाला परफ्युम वापरायला आवडतं ? त्यासाठी वेगवेगळे ब्रँड्स, सुगंध असा सगळाच विचार तुम्ही करत असाल पण त्याचबरोबर परफ्युम कसं वापरता हे देखील महत्त्वाचं आहे. परफ्यूम लावताना, थेट मानेवर किंवा घशावर स्प्रे करत असाल तर ही माहिती नक्की वाचा.
News18
News18
advertisement

गळ्यावर किंवा घशावर परफ्युम स्प्रे करणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. परफ्युम लावल्यानं दीर्घकाळात मोठ्या हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. आहार तज्ज्ञ डॉ. क्रिस्टेबेल अकिनोला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. त्यात गळ्यावर, मानेवर स्प्रे करणं का हानिकारक आहे याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.

Face Mask : तेलकट त्वचेसाठी DIY फेसमास्क, कडुनिंबाची पानं आणतील चेहऱ्यावर ग्लो

advertisement

डॉक्टरांच्या मते, मानेवरची त्वचा खूप पातळ, उबदार आणि संवेदनशील असते. इथे अनेक रक्तवाहिन्या असतात, त्यामुळे कोणतंही रसायन शरीरात वेगानं शोषलं जातं.

थायरॉईड ग्रंथी या भागाच्या अगदी खाली असतात. या ग्रंथी वजन, ऊर्जा पातळी, मनःस्थिती, हृदयाची लय, मासिक पाळी, प्रजनन क्षमता आणि गर्भधारणा यासह अनेक महत्वाच्या शरीराच्या कार्यांवर नियंत्रण ठेवत असतात. या ग्रंथीवर परिणाम झाला तर संपूर्ण शरीर असंतुलित होऊ शकतं.

advertisement

Periods Pain : मासिक पाळीत असह्य वेदना ? दुखणं कमी करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनेक परफ्युममध्ये एंडोक्राइन डिसप्टर्स म्हणून ओळखली जाणारी रसायनं असतात. दररोज गळ्याला परफ्यूम लावल्यानं तुमच्या शरीरात हळूहळू ही रसायनं जमा होऊ शकतात. कालांतरानं, यामुळे पुढील गोष्टी होऊ शकतात:

थायरॉईड डिस्फंक्शन

वजन वाढणं किंवा कमी होणं

नेहमी थकवा जाणवणं

advertisement

हार्मोनल असंतुलन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

प्रजनन समस्या - गर्भधारणेच्या वाढत्या गुंतागुंतीसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. डॉक्टरांच्या मते, परफ्युम लावायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कधीही तुमच्या मानेवर किंवा घशावर परफ्यूम स्प्रे करू नका. त्याऐवजी, कपड्यांवर हलकं स्प्रे करू शकता. त्यामुळे, परफ्युम वापरताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. प्रकृतीला जपा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Perfume : मानेवर परफ्युम स्प्रे का नाही करायचं ? त्वचेच्या, हार्मोनल समस्या होतील सुरु, वाचा सविस्तर माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल