उशिरा झोपण्याचे तोटे-
उशिरा झोपल्यानं व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक तणावामुळे कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घेण्याच्या त्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न घेतल्यानं हृदयविकाराचा झटका येणं, मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. हे आजार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पुरेशी झोप न मिळाल्यानं, अनेकदा चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. मुळात, झोप ही आपल्या शरीराची जैविक गरज आहे हे लक्षात ठेवा.
advertisement
Sesame seeds - पांढरे तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे, आहारात करा समावेश
जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवत असाल तर तुमच्यासाठी झोप घेणं खूप महत्वाचं आहे कारण असं केलं नाही तर तुमची एकाग्रता कमी होते. त्यामुळे तुमच्या शिकवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
झोप सुधारण्यासाठी हे नक्की करा -
चांगल्या झोपेसाठी, रात्री झोपण्याची वेळ निश्चित करा. साधारण 7-8 तासाची झोप आवश्यक आहे. रात्री झोपायला जात असाल तेव्हा किमान एक तास आधी मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं बंद करा. कारण, यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. रात्री झोपण्यासाठी पलंग स्वच्छ, टापटीप असावा. आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवा. याशिवाय तुम्ही चांगल्याझोपेसाठी ध्यान आणि योगासनंही करू शकता. रात्री हलकं अन्न घ्या. खाल्ल्यानंतर थोडासा फेरफटका मारावा.
आता विशीतच होतोय ब्रेस्ट कॅन्सर! भारतातील परिस्थिती तर आणखीनच बिकट
एकाग्रता, स्मरणशक्तीसाठी चांगली आणि गाढ झोप आवश्यक आहे, अपुऱ्या झोपेचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होतो. मुळात दिवसभराच्या दगदगीनंतर, मेंदूला विश्रांतीची गरज असते, त्यामुळे याबद्दल बाऊ करण्यापेक्षा झोपेच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं अधिक सरस ठरेल.
