केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस कोरडे होतात. थंडीची कोरडी हवा आणि त्यात गरम पाण्यानं केस धुतल्यानंही केस कोरडे होतात आणि केसांची चमक कमी होते. अशा परिस्थितीत केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि केस मऊ करण्यासाठी काही हेअर मास्क घरीच बनवून लावता येतात.
हे हेअर मास्क बनवायला सोपे आहेत आणि त्यांचा प्रभावही लवकर दिसून येतो. हा हेअर मास्क 15 ते 20 मिनिटं
advertisement
डोक्यावर ठेवल्यानं केसांना आवश्यक आर्द्रता मिळते.
Coconut : कल्पवृक्ष नारळाचे आरोग्यदायी फायदे, त्वचा, पचनासाठी खूप उपयुक्त
दूध आणि मध -
केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी हा उपाय रामबाण उपाय आहे. यासाठी एका भांड्यात दूध आणि मध एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावता येते. ते लावण्यासाठी बोटांचा वापर करा किंवा कापसाच्या मदतीनं लावा.
अंडी आणि दही -
अंडी बायोटिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ए आणि फोलेटचा चांगला स्रोत आहे आणि केसांचा कोरडेपणा
दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. अंडी डोक्यावर लावता येतात. अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात २ अंडी फोडून त्यात दही मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि 15 ते 30 मिनिटं ठेवा. तुम्ही ते तासभरही ठेवू शकता. यामुळे केस मऊ होऊ लागतात आणि कोरडे दिसत नाहीत.
Walnuts : अक्रोड खा, तंदुरुस्त राहा, मेंदूच्या आरोग्यासाठीही आहे पोषक
दही आणि मध -
दही आणि मधाचा हेअर मास्क केसांना मऊ करण्यासाठी चांगला परिणाम दर्शवितो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी अर्धा कप दह्यात २ चमचे मध मिसळा. हा हेअर मास्क मिक्स करून 15 ते 20 मिनिटं डोक्यावर लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क केसांना बायोटिन आणि दाहक-विरोधी गुणधर्माबरोबरच, टाळू स्वच्छ करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
केळी आणि अंडी
केस मऊ करण्यासाठी केळी आणि अंड्याचा हेअर मास्क लावता येतो. या हेअर मास्कमुळे केस मऊ होतात आणि केसांमध्ये साचलेली घाणही दूर होते. एक केळ कुस्करा, त्यात एक अंड मिसळा. या मास्कमध्ये थोडं दही घाला. हा हेअर मास्क केसांना २० मिनिटांसाठी लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा वापरता येतो.