Coconut : कल्पवृक्ष नारळाचे आरोग्यदायी फायदे, त्वचा, पचनासाठी खूप उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं हे आपल्याला माहित आहे कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक घटकाचा खूप उपयोग होतो. कच्चा ओला नारळ खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं, कोरडं खोबरं वापरुनही अनेक पदार्थ बनवले जातात.
मुंबई : घरोघरच्या स्वयंपाकात नारळाचा वापर हमखास असतो. भाजी, वरण, पोहे, उपमा किंवा अनेक पदार्थात खोबरं वापरलं जातं. शिवाय नारळाची चटणी आणि नारळाचे लाडूही बनवले जातात. नारळ म्हटलं की पहिले आठवतं नारळाचं पाणी. हे पाणी पिण्याचे फायदे आपल्याला माहित असतात पण याच कच्च्या खोबऱ्याचे फायदे मात्र अनेकांना माहित नसतात. त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही आजपासूनच नारळ खाण्यास सुरुवात कराल.
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं हे आपल्याला माहित आहे कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक घटकाचा खूप उपयोग होतो. कच्चा ओला नारळ खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं, कोरडं खोबरं वापरुनही अनेक पदार्थ बनवले जातात. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला गुळ - खोबरं देण्याची प्रथा गावागावात अजूनही आहे. कोरडं खोबरं किंवा कच्चं, ओलं खोबरं वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
advertisement
जाणून घेऊया कच्चा ओला नारळ खाण्याचे आरोग्य फायदे.
1. पचनासाठी फायदेशीर -
जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही खोबरं खा. खोबऱ्यात फायबर असतं, ज्यामध्ये पचनसंस्था निरोगी
ठेवण्याची क्षमता असते.
2. शरीरासाठी ऊर्जादायी -
खोबऱ्यामध्ये असलेले घटक ऊर्जा प्रदान करण्यास उपयुक्त आहेत. त्यात असलेले ट्रायग्लिसराइड्सचं शरीरात
advertisement
सहज पचन होतं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
3. लठ्ठपणा कमी करण्यात मदत -
कच्च्या नारळात फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात, जे भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करतात.
४. त्वचेसाठी फायदेशीर -
कच्च्या नारळाचं सेवन त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि
advertisement
अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आर्द्रता देऊ शकतात.
5. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
कच्च्या नारळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2024 1:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Coconut : कल्पवृक्ष नारळाचे आरोग्यदायी फायदे, त्वचा, पचनासाठी खूप उपयुक्त