Walnuts : अक्रोड खा, तंदुरुस्त राहा, मेंदूच्या आरोग्यासाठीही आहे पोषक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सुक्या मेव्यातील प्रत्येक घटक आरोग्यासाठी पोषक आहे, त्यातलाच एक म्हणजे अक्रोड...अक्रोड खाण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीत योग्य खाणं म्हणजेच योग्य आहार असणं खूप आवश्यक आहे. त्यातही नेहमीच्या आहारापेक्षा सुका मेवा खाणंही आरोग्यासाठी आवश्यक आहे. सुक्या मेव्यातील प्रत्येक घटक आरोग्यासाठी पोषक आहे, त्यातलाच एक म्हणजे अक्रोड...अक्रोड खाण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
मेंदूसाठी उपयुक्त -
अक्रोड खाल्ल्यानं अनेक आजार दूर पळतात. मेंदूच्या रचनेप्रमाणे दिसणारे अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट मेंदूच्या पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात.
advertisement
आयुर्वेद आणि पंचकर्मानुसार, अक्रोडामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, प्रथिनं, फायबर, जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो. याचं पुरेशा प्रमाणात नियमित सेवन
करणं आवश्यक आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासही अक्रोड उपयुक्त आहेत. याशिवाय अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांमध्येही अक्रोड उपयुक्त आहेत.
advertisement
हृदयासाठी उपयुक्त -
अक्रोडामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आजारांवर उपयुक्त आहेत.
पोटाचं आरोग्य, वजन नियंत्रणातही फायदेशीर -
अक्रोडामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आणि प्रथिनं आढळतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं वाटतं आणि भूक लवकर लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही अक्रोड उपयुक्त आहे. पुरेशा प्रमाणात फायबर असल्यानं, म्हणजेच तंतुमयता असल्यानं अक्रोड योग्य पचनासाठी खूप उपयुक्त आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही अक्रोड खूप फायदेशीर आहे. अक्रोड खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिणं फार महत्वाचं आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तसंच, सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील डाग काढून
advertisement
टाकण्यास देखील यामुळे मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2024 5:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Walnuts : अक्रोड खा, तंदुरुस्त राहा, मेंदूच्या आरोग्यासाठीही आहे पोषक