Baldness : टक्कल पडणं किंवा केस गळण्यावर उपाय, हे तेल वापरा, पंधरा दिवसात वाढतील केस
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस गळणं टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात, त्यात एक महत्त्वाचा उपाय म्हणजे रोझमेरीचं तेल. यामुळे टाळूमधील रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते.
मुंबई : अनेक कारणांमुळे केस गळणं किंवा टक्कल पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यातच एक म्हणजे एका तेलाचा वापर. जर तुम्हाला टक्कल असेल तर या तेलाचे 4 थेंब लावून रोज रात्री टाळूवर मसाज करा, केस 15 दिवसात वाढायला सुरुवात होईल.
सुंदर केस ही एखाद्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. पण, आजकाल केसांची योग्य काळजी न घेतल्यानं केस गळण्याची समस्या सर्रास दिसून येते, केसांची निगा राखणारी केमिकलयुक्त उत्पादनं आणि प्रदूषण यामुळे केस खराब होणं, केस कोरडे होणं, गळणं अशा अनेक समस्या जाणवतात.
advertisement
काहींची समस्या खूप गंभीर असते आणि केसांची काळजी घेण्यासाठी आणि ते गळण्यापासून रोखण्यासाठी लोक महागड्या उत्पादनांवर तसंच उपचारांवर खूप खर्च करतात. पण बहुतेक प्रकरणांमध्ये निकाल समाधानकारक दिसून येत नाहीत.
केसगळतीमुळे अनेकांना ताण जाणवतो. अलीकडेच, केसांची काळजी घेणाऱ्या तज्ज्ञांनी अशा केसांशी संबंधित
समस्यांसाठी अतिशय प्रभावी उपाय सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या उपायांनी केस गळण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि टक्कल पडण्याची समस्या टाळता येते.
advertisement
केस गळण्याचं कारण
केस गळण्याच्या कारणांमध्ये तणाव, पोषणाचा अभाव, संप्रेरकांचं असंतुलन आणि केसांची काळजी न घेणं अशा अनेक कारणांचा समावेश असू शकतो. या तणावाचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर केस गळू शकतात. आहारात आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं नसल्यामुळेही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. यासोबतच पीसीओडी आणि शरीरातील हार्मोनल असंतुलनाशी संबंधित थायरॉईडच्या समस्यांमुळेही केस गळतात. केसांची योग्य ती काळजी न घेतल्यानं केस झपाट्यानं गळू लागतात.
advertisement
केस गळणं टाळण्यासाठी उपाय
रोझमेरी तेल केसांशी संबंधित समस्यांपासून आराम देऊ शकते. यामुळे टाळूमधील रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते. रोझमेरी तेल खूप घट्ट आहे, म्हणून ते इतर तेलात मिसळून वापरावं. रोझमेरी तेलासाठी नारळ किंवा एरंडेल तेल वापरलं जाऊ शकतं. केसांसाठी, रोझमेरी तेल कोणत्याही प्रकारच्या रसायनांपासून मुक्त आहे. नारळ किंवा एरंडेल तेल घ्या आणि त्यात रोझमेरी ऑइलचे चार थेंब घाला. या मिश्रणानं टाळूला नीट मसाज करा. हा उपाय काही काळ नियमितपणे करत राहा. या उपायानं केसगळतीची समस्या हळूहळू दूर होईल आणि यानंतर टाळूवर नवीन केस येण्यास सुरुवात होईल.
advertisement
केसांसाठी रोझमेरी तेलाचे फायदे -
रोझमेरी तेल केसांची वाढ सुरु करण्यास मदत करते. या तेलाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हे टाळूच्या भागात रक्ताभिसरण वाढवतं, ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. यातील जीवनसत्त्वं आणि खनिजं केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केस मजबूत होतात.
रोझमेरी तेल आणि कोरफड वापरुन केस तुटण्याचं प्रमाण कमी करता येतं. रोझमेरी तेलामध्ये अँटीफंगल आणि
advertisement
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा कमी करण्यास मदत होते. रोझमेरी तेलानं केस गळण्याची समस्या कमी होते आणि केस मजबूत होतात. त्याच्या नियमित वापराने केस लवकर वाढतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2024 7:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Baldness : टक्कल पडणं किंवा केस गळण्यावर उपाय, हे तेल वापरा, पंधरा दिवसात वाढतील केस