TRENDING:

Winter Health Tips : हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांसाठी पपई चांगली की वाईट? पाहा कसा होईल परिणाम

Last Updated:

हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतुत पपई मिळते. पण पपई उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त मिळते. परंतू ही पपई अस्थमाच्या रुग्णांनी खावी की नाही याविषयी जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्या आहारात फळांचा समावेश असणं फायदेशीर असतं. फळांमध्ये असणारी जीवनसत्त्वं व पोषक घटक आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवतात, तसेच उर्जा वाढवण्याचंही काम करतात. इतर फळांप्रमाणेच पपईचं सेवन करणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतुत पपई मिळते. पण पपई उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त मिळते. हिवाळ्यात पपई अगदी स्वस्त मिळते आणि ती तुम्ही भरपूर प्रमाणात खाऊ शकता. पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन ए आणि मिनरल्सनी समृद्ध असलेलं सुपरफूड आहे.
हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांसाठी पपई चांगली की वाईट? पाहा कसा होईल परिणाम
हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांसाठी पपई चांगली की वाईट? पाहा कसा होईल परिणाम
advertisement

आपल्या आहारात पपईचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. अनेक अभ्यासांतून असे दिसून आलं आहे की, पपईमध्ये असलेले लायकोपीन आणि व्हिटॅमिन सी हृदयरोग टाळण्यास मदत करतात. पपईमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या हृदयाचं रक्षण करू शकतात आणि चांगलं कोलेस्टेरॉल वाढवून खराब कोलेस्टेरॉल कमी करू शकते.

Lakshadweep : लक्षद्वीपला जाण्याच प्लॅनिंग करताय? मग सोबत ठेवा 'ही' कागदपत्र, नाहीतर एंट्री मिळणार नाही

advertisement

पपई थंड आहे की उष्ण?

पपईचा गुणधर्म उष्ण असतो, त्यामुळे तुम्ही हिवाळ्यातही पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने तुमचं शरीर गरम राहतं. पपई ही लिव्हर, किडनी आणि आतड्यांसाठी चांगली मानली जाते आणि ती शरीर डिटॉक्स करण्याचं काम करते असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात तुम्ही पपई आरामात खाऊ शकता.

पपई पोटासाठी खूप फायदेशीर

advertisement

अपचन, छातीत जळजळ, अ‍ॅसिड रिफ्लक्स, पोटातील अल्सर यांसह अनेक आजारांवर पपई खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. तसंच पपई खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. पपईमध्ये पेपन नावाचं एक विशेष प्रोटिन असतं, जे सुपर एन्झाइमप्रमाणे काम करतं. पपईमुळे अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधीच्या समस्याही लगेच दूर होतात.

अस्थमा असेल तर पपई खाणं चांगलं

advertisement

पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिन असतं जे फुफ्फुसाची सूज रोखण्यास मदत करतं. तसंच, ज्यांना धूम्रपानाचं व्यसन आहे त्यांनीही भरपूर पपई खावी, यामुळे फुफ्फुसाची सूज दूर होते. इतकंच नाही तर पपई अस्थमा ट्रिगर होण्यापासून रोखते.

पपई हाडांसाठी फायदेशीर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

पपई हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. रूमेटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टियोअर्थरायटिसच्या उपचारांमध्ये देखील हे खूप प्रभावी आहे. पपईमध्ये आढळणाऱ्या एन्झाईम्सना कायमोपॅपेन म्हणतात. हे हाडं मजबूत करण्याचे काम करतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips : हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांसाठी पपई चांगली की वाईट? पाहा कसा होईल परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल