ओला S1 X
ओला इलेक्ट्रिकनं भारतात S1 X ई-स्कूटर लाँच केली आहे. तीन व्हर्जन्समध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीची किंमत 89,999 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. फ्लॅगशिप S1 X+ मध्ये नवीन 5.0-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. S1 X+ साठी 1.10 लाख रुपये, S1 X 3kWh साठी 99,999 रुपये आणि S1 X 2 kWh साठी 89,999 रुपये (सर्व किंमती, एक्स-शोरूम) अशा तीन व्हर्जन्सच्या किंमती आहेत. S1 X+ आणि S1 X 3kWh मध्ये 6kW (किलोवॅट) मोटर आणि 3kWh (किलोवॅट अवर) बॅटरी आहे, जी 151 किमी रेंज आणि 90 किमी प्रतितास टॉप स्पीड देते. तर S1 X 2kWh मध्ये 6kW मोटर आणि 2kWh बॅटरी आहे, जी 91 किमी रेंज आणि 85 किमी प्रतितास टॉप स्पीड देते.
advertisement
वाचा-चहा गाळून उरलेली चहापत्ती फेकून देता? थांबा असा करा त्याचा उपयोग
टीव्हीएस X
टीव्हीएस मोटर कंपनीनं दुबईमध्ये आपल्या 'टीव्हीएस X' या इलेक्ट्रिक स्कूटरचं अनावरण केलं. या गाडीची किंमत 2.50 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, बेंगळुरू) सुरू होते. या गाडीची कस्टमर डिलिव्हरी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. सुरुवातीला बेंगळुरूमध्ये आणि वर्षाच्या अखेरीस इतर 15 शहरांमध्ये गाडीचं वितरण सुरू होईल. स्लीक एलईडी लाईट्ससह समकालीन डिझाईन असलेली ही स्कूटर XLETON प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हायलायटेड फीचर्समध्ये एक प्रशस्त 19-लिटर युटिलिटी बॉक्स आणि एक अद्वितीय 10-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर समाविष्ट आहे. शिवाय, ई-स्कूटरमध्ये 175mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 770mm उंचीचं रायडर सीट आहे. Xtride, Xtealth आणि Xonic असे तीन रायडिंग मोड या गाडीत आहेत.
हिल होल्ड कंट्रोल सुरक्षितता वाढवते. नाविन्यपूर्ण रॅम-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर केवळ 2.4 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेगाने धावून 140 किमीच्या रेंजसह 105 किमी प्रतितास हा सर्वोच्च स्पीड देते. पोर्टेबल आणि रॅपिड चार्जर या दोन्ही पर्यायांसह स्कूटर 3 तास 40 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर
प्रख्यात भारतीय ईव्ही स्टार्टअप असलेल्या सिंपल एनर्जी कंपनीनं 'सिंपल वन' ही गाडी लाँच केली आहे. 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी या गाडीची स्टार्टिंग प्राईज आहे. या गाडीचं सुपर ईव्ही मॉडेल 750W चार्जरसह 1.58 लाख (एक्स-शोरूम) रुपयांना उपलब्ध आहे. ही मेड-इन-इंडिया ई-स्कूटर 212 किमीची प्रभावी रेंज देते. सर्वात लांब रेंज देणारी ही देशातील पहिली गाडी आहे. ही या सेगमेंटमधील सर्वात वेगवान गाडी देखील आहे, जी फक्त 2.77 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेगाने जाते. ई-स्कूटरमध्ये थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम, फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि एनहान्स राइडिंग अनुभवासाठी अत्याधुनिक 7-इंचाचा डिजिटल डिस्प्ले आहे.
वाचा-जगभरातील ब्रँडेड शूजची 'इथं' करा स्वस्तात खरेदी, किंमत पाहून बसणार नाही विश्वास
एथर 450S
एथर एनर्जी या इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनीनं भारतात, 450S ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या गाडीची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. कंपनीनं 115-km आणि 145-km रेंजचे प्रकार अनुक्रमे 1.38 लाख 1.45 लाख रुपयांना ऑफर केले आहेत. 450X मॉडेल वाढवून कंपनीनं आपली सध्याची लाइनअप देखील अपग्रेड केली आहे. 450S मध्ये 2.9 kWh बॅटरी, 115 किमी रेंज आणि 90 किमी प्रतितासांचा टॉप स्पीड आहे. कंपनी अथर 450S साठी 14,000 रुपये, 450X साठी (2.9 kWh बॅटरी) 16,000 रुपये आणि 450 साठी (3.7 kWh बॅटरी) 23,000 रुपये किंमतीचे प्रो पॅक ऑफर करते. ज्यामध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स आहेत.
रिव्हर इंडी
रिव्हर या देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन कंपनीनं कर्नाटकातील होस्कोट येथील त्यांच्या नवीन उत्पादन प्रकल्पात उत्पादित केलेल्या पहिल्या ई-स्कूटरचं अनावरण केलं आहे. अद्ययावत FAME II सबसिडी एथर मिळणाऱ्या या 'इंडी' ई-स्कूटरची किंमत लवकरच जाहीर होईल. प्री-ऑर्डरसाठी ही गाडी बेंगळुरूमध्ये 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे.
120,000-चौरस-फूट क्षेत्रफळ असलेली ही फॅसिलिटी (कारखाना) वर्षाला 100,000 युनिट्सचं उत्पादन करू शकते. या फॅसिलिटीत बॅटरी आणि वाहनांसाठी नाविन्यपूर्ण स्वयंचलित असेंब्ली लाइनचं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिव्हर बेंगळुरूमध्ये एक प्रायोगिक केंद्र देखील बांधत आहे. नोव्हेंबरमध्ये ते उघडणार आहे. या अग्रगण्य कंपनीचं उत्पादन आणि कॉर्पोरेट दोन्ही मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत, जे इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या स्कूटर्स केवळ इको-फ्रेंडली कम्युटिंग सोल्युशन्सच देत नाहीत तर तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि परवडण्याच्या क्षमतेलाही प्राधान्य देतात. भारतातील ईव्ही बाजारपेठ विकसित होत असताना, या इलेक्ट्रिक स्कूटर्स क्लिन आणि अधिक टिकाऊ वाहतुकीसाठी एक आशादायक भविष्य दर्शवितात.