advertisement

Used Tea Leaves Benefits : चहा गाळून उरलेली चहापत्ती फेकून देता? थांबा असा करा त्याचा उपयोग

Last Updated:

गाळलेल्या चहापत्तीचे अनेक फायदे असून याचा वापर तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता.

चहा गाळून उरलेली चहापत्ती फेकून देता? थांबा असा करा त्याचा उपयोग
चहा गाळून उरलेली चहापत्ती फेकून देता? थांबा असा करा त्याचा उपयोग
दिवसभरात चहा प्यायला नाही तर अनेकांना फ्रेश वाटत नाही त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये सकाळ, दुपार, आणि संध्याकाळ या वेळेला चहा हमखास केला जातो. परंतु बरेचजण चहा गाळून झाला की चहापत्ती डस्टबीनमध्ये फेकून देतात. परंतु या गाळलेल्या चहापत्तीचे अनेक फायदे असून याचा वापर तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता.
त्वचेची टॅनिंग घालवण्यासाठी : चहानंतर उरलेली चहापत्ती ही त्वचेची टॅनिंग घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तेव्हा चहाची पाने उन्हात वाळवा आणि नंतर बारीक करून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. आता टॅनिंग दूर करण्यासाठी गुडघे, कोपर आणि मानेवर लावा असे केल्याने तुम्ही त्वचेची टॅनिंग घालवू शकता.
केसांवर शाईन आणण्यासाठी : निरुपयोगी समजली जाणारी चहाची पाने केसांवर लावल्यास ते आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरतात. चहापत्ती पुन्हा उकळून त्याचे पाणी सामान्य होई पर्यंत वाट पहा. नंतर तुम्ही ते कंडिशनर म्हणून वापरू शकता. असे केल्याने केस चमकदार होतील.
advertisement
जखमांवर लावू शकता : चहाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेवरील जखमा भरण्यास मदत होते. तेव्हा उरलेली चहाची पाने एकदा धुवा आणि नंतर गरम पाण्यात उकळा. आता दुखापत झालेल्या भागावर लावा आणि मग काही वेळाने धुवून टाका.
भांडी स्वच्छ करण्यासाठी : उरलेल्या चहाच्या पानांच्या मदतीने तुम्ही भांडी देखील स्वच्छ करू शकता. गाळल्यानंतर चहाची पाने स्वच्छ धुवा आणि एका पॅनमध्ये पाण्यात उकळा. आता या पाण्याने खरकटी भांडी धुतल्यास तेलाचे डाग, डाग आणि खुणा नाहीशा होतात.
advertisement
कंपोस्ट खत : उरलेल्या चहापत्तीचा वापर तुम्ही कंपोस्ट खत म्हणून देखील करू शकता. परंतु चहापत्ती खत म्हणून वापरताना ती आधी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. जेणेकरून त्याची साखर निघून जाईल. मग तुम्ही ही पावडर कुंडीत किंवा बागेच्या मातीत मिसळली तर रोपाला फायदा होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Used Tea Leaves Benefits : चहा गाळून उरलेली चहापत्ती फेकून देता? थांबा असा करा त्याचा उपयोग
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement