डोंबिवली : अनेकजणी डेली वेअरसाठी, ऑफिससाठी आणि त्यासोबत कॉलेजसाठी चांगले वाटतील असे कपडे शोधत असतात. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आदिती ड्रेसेसमध्ये फक्त 200 ते 250 रुपयांपासून सुंदर कुर्तीची किंमत सुरू होत आहे. इथे अगदी स्वस्त किंमतीमध्ये सुंदर कपडे मिळत असल्यामुळे डोंबिवलीकरांची गर्दी पाहायला मिळते.
सुंदर कुर्ती सेट आणि ड्रेस मटेरियल हवे असेल तर हे दुकान बेस्ट ऑप्शन आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे अनेकदा तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या लग्न समारंभात किंवा लग्नाच्या पार्टीला जावे लागतं असेल. जर तुमच्या जवळच्या, खास व्यक्तीची ही पार्टी असेल तर त्या प्रसंगी घालायला तुमच्याकडे उत्तम असा एखादा ड्रेस हवाच. या अदिती ड्रेसेसमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारचा ड्रेस मिळेल. तुम्हाला इंडो वेस्टर्न कुर्ती, पटियाला सेट, लॉन्ग कुर्ती सेट असे सगळे ड्रेसेस उपलब्ध आहेत.
advertisement
एकदाच नव्हे पुन्हा पुन्हा वापरा, प्रजासत्ताक दिनी द्या खास नॅपकिन बुके, किंमत फक्त 40 रुपये!
कुर्ती कलेक्शनमध्ये तुम्हाला अंगरखा कुर्ती, कालिदार कुर्ती, एलाइन कुर्ती, लखनवी कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती हे सगळे प्रकार मिळतील. तुम्हाला जर प्लेन कुर्ती हवी असेल तर त्याची किंमत इथे फक्त 250 रुपयांपासून सुरू होते. सध्या मुलींमध्ये शॉर्ट कुर्तीचा प्रकार ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्येही 10 हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. या प्रकारांमध्ये प्रिंटेड शॉर्ट कुर्ती, प्लेन कुर्ती, फ्लॉवर कुर्ती, नायरा कट शॉर्ट कुर्ती असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. तुम्हाला जर फॉर्मल वेअर हवे असतील तर ते सुद्धा इथे तुम्हाला मिळतील.
'आमचं हे ड्रेसेसचे दुकान गेले 25 वर्ष जुनं आहे. आमच्या इथे मिळणाऱ्या कुर्ती बरोबरच वेगवेगळ्या आणि सुंदर ड्रेसेसचा कपडा सुद्धा मिळतो. जर कोणाला होलसेलमध्ये कुर्ती हवी असेल तरी आमच्याकडे मिळते. अनेक जण आमच्या इथून होलसेल रेटमध्ये कुर्ती कलेक्शन घेतात आणि इतर ठिकाणी जाऊन विकतात' असे दुकानदार चिराग यांनी सांगितले.