TRENDING:

ख्रिसमसची खरेदी करा फक्त 50 रुपयांपासून, जिंगलबेलपासून ते ख्रिसमस ट्री सगळं माटुंग्यात एकाच ठिकाणी

Last Updated:

अनेकजण ख्रिसमस उत्साहात साजरा करतात. त्यामुळे मुंबईतल्या मार्केटमध्ये ख्रिसमससाठी लागणाऱ्या सगळया गोष्टी आलेल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : नाताळ अगदी आठवड्या भरावर येऊन ठेपलाय. अनेकजण ख्रिसमस उत्साहात साजरा करतात. त्यामुळे मुंबईतल्या मार्केटमध्ये ख्रिसमससाठी लागणाऱ्या सगळया गोष्टी आलेल्या आहेत. ख्रिसमसच्या सामानासाठी माटुंगा खूप प्रसिद्ध आहे. माटुंगा स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आऊट लुक या दुकानात तुम्हाला फक्त 50 रुपयांपासून ख्रिसमसचे सामान मिळेल. यामध्ये अगदी ख्रिसमस ट्री पासून जिंगल बेलपर्यंत सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत.

advertisement

आउट लूकमध्ये मिळणारे ख्रिसमस ट्री खूप सुंदर असतात. तुम्ही पाहू शकता इथे अगदी स्मॉल ट्री पासून ते मोठ्या क्रिसमस झाडांपर्यंत सगळे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हे ख्रिसमस ट्री सजवून हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. इथे मिळणाऱ्या या छोट्या क्रिसमस ट्रीची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते. तुमच्या लहानग्यांना तुम्हाला जर ख्रिसमस ट्री खरेदी करून द्यायचं असेल किंवा ऑफिसमध्ये ख्रिसमस डेकोरेशनसाठी ख्रिसमस ट्री हवे असतील तर हे छोटे ख्रिसमस ट्री बेस्ट ऑप्शन ठरतील. तुम्हाला जर घरात लावण्यासाठी मोठे ख्रिसमस ट्री हवे असतील तर त्यांची किंमत सुध्दा फक्त 600 रुपयांपासून सुरू होते.

advertisement

ब्रायडल चोकर सेट पासून ते इमिटेशन ज्वेलरीपर्यंत सगळं एकाच ठिकाणी, डोबिंवलीतील हे शॉप एकदम बेस्ट

तुम्हाला ख्रिसमस ट्री बरोबरच त्याला सजवण्यासाठी सुंदर डेकोरेशन पर्यायसुद्धा मिळतील. ज्यामध्ये स्टार, बलून, छोटे डिझाईन बॉल, मेरी ख्रिसमस किंवा सॅन्टाचे वेगवेगळे फोटो असणारे डिझाईन फक्त 50 रुपयांमध्ये मिळतील. जिंगल बेल्समध्ये सुद्धा इथे वेगवेगळ्या आवाजांचे बेल उपलब्ध आहेत. हे जिंगल बेल तिथे तुम्हाला 100 रुपयांपासून मिळतील. ज्या रंगांमध्ये हवे असतील ते रंग आणि डिझाईन सुद्धा यात उपलब्ध आहे. नाताळचे सेलिब्रेशनला आणखी खास बनवते ती म्हणजे सॅन्टाची लाल टोपी. त्या टोपीमध्ये सुद्धा तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या साईजमध्ये टोप्या मिळतील.

advertisement

अनेकजण ख्रिसमसला आपल्या आप्तेष्टांना भेट सुद्धा देतात. तुम्हालाही जर कोणाला देण्यासाठी युनिक आणि सुंदर गिफ्ट हवे असतील तरी आज सुद्धा सॅन्टा क्लॉक, सॅन्टा होम, सॅन्टा, स्नो मॅन असं सगळं काही मिळेल.

'आमच्याकडे अगदी 50 रुपयांपासून ख्रिसमसचं सगळं सामान मिळेल. तुम्हाला ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी सगळ्या सुंदर आणि युनिक गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत. अनेक जण आवर्जून दर वर्षी आमच्या दुकानात ख्रिसमसच्या खरेदीसाठी येतात' असे किरण यांनी सांगितले.

advertisement

मग मंडळी वाट कसली पाहताय. नाताळच सेलिब्रेशन खास करायचं असेल, आणि तुमची ख्रिसमस ट्री तुम्हाला मनासारखी सजवायची असेल तर आवर्जून माटुंग येथील या दुकानाला भेट द्या. आणि इथल्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून तुमची ख्रिसमस ट्री अगदी सुंदर सजवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ख्रिसमसची खरेदी करा फक्त 50 रुपयांपासून, जिंगलबेलपासून ते ख्रिसमस ट्री सगळं माटुंग्यात एकाच ठिकाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल