ब्रायडल चोकर सेट पासून ते इमिटेशन ज्वेलरीपर्यंत सगळं एकाच ठिकाणी, डोबिंवलीतील हे शॉप एकदम बेस्ट

Last Updated:

अनेकजण हल्ली लग्नात वन ग्रॅम ज्वेलरी घालण्यावर अधिक भर देतात. या सगळ्या दागिन्यांमुळे लूक उठावदार तर दिसतोच आणि सोन्याच्या दागिन्यांची गरज सुद्धा भासत नाही.

+
सोन्याचे

सोन्याचे दागिने घालण्याऐवजी ट्राय करा वन ग्राम ज्वेलरी

साक्षी पाटील-प्रतिनिधी
डोंबिवली : सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला असल्यामुळे प्रत्येक नवरी आपल्या लग्नात पण लूक सुंदर कसा होईल याकडे विशेष लक्ष देत आहे. नवरीच्या वेशभूषेला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात ते म्हणजे दागिने. त्यामुळे हे दागिने कुठे मिळतील याच्या शोधात सध्या सगळे जण आहेत. फक्त नवरीसाठीच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या सणसमारंभासाठी दागिने शोधायचे असतील तर हे डोंबिवलीत शॉप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
डोंबिवली मधील 'सेनोरिटा' या ज्वेलरी शॉपमध्ये ब्रायडल ज्वेलरी फक्त 500 रुपयांपासून सुरू होते. हे दुकान वन ग्रॅम ज्वेलरीसाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण हल्ली लग्नात वन ग्रॅम ज्वेलरी घालण्यावर अधिक भर देतात. या सगळ्या दागिन्यांमुळे लूक उठावदार तर दिसतोच आणि सोन्याच्या दागिन्यांची गरज सुद्धा भासत नाही. इथे तुम्हाला शंभरहून अधिक प्रकारच्या दागिन्यांचे प्रकार मिळतील.
advertisement
परफेक्ट लूक येण्यासाठी पेहरावासोबत अ‍ॅक्सेसरीजकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. अ‍ॅक्सेसरीजमध्ये नेकपीस हा कमालीचं लक्ष वेधून घेणारा प्रकार आहे. नेकपीसला आणखी उठावदार बनवणारा प्रकार म्हणजे चोकर. इथे तुम्हाला वनग्राम ज्वेलरी मध्ये चोकर हा प्रकार फक्त 3000 रुपयांपासून मिळेल. चोकर मध्ये सुद्धा येथे तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल. यामध्ये चेन चोकर, ऑक्सीडाईज चोकर, पारंपारिक चोकर उपलब्ध आहेत. तर वनग्राम मंगळसूत्रांच्या किमती सुद्धा फक्त 1290 पासून सुरू होतात.
advertisement
तुम्हाला जर इमिटेशन ज्वेलरी हवी असेल तर त्याची किंमत इथे फक्त 25 रुपयांपासून सुरू होते. इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी सेट आणि ब्रायडल सेट मिळतील. अनेक जणी बेंटेक्सचे दागिने घालण्यास सुद्धा प्राधान्य देतात.  तुम्हाला बेंटेक्सचे मोत्यांचे हार 500 रुपयांपासून तर माळ 150 रुपयांपासून मिळतील. बांगड्यांची किंमत तर फक्त 100 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला जर नव्या स्टाईलचे ब्राईड नथ हवे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला खूप व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
'आमच्या सेनोरिटामध्ये ग्राहकांना अगदी हव्या त्या प्रकारचे दागिने मिळतील. यामध्ये बेंटेक्स, इमिटेशन ज्वेलरी आणि खास करून वन ग्राम ज्वेलरी आमच्याकडे मिळेल. सध्या खऱ्या दागिन्यांपेक्षा वन ग्राम ज्वेलरी ला अधिक लोक प्राधान्य देतात. कारण यामध्ये खूप व्हरायटी सुद्धा आहे आणि किंमत सुद्धा स्वस्त आहे.' असे 'सेनोरिटा' चे दुकानदार हनुमंत कदम यांनी सांगितले.
advertisement
मग मंडळी वाट कसली पाहताय, या लग्नसराई तुम्हाला देखील तुमचा लूक अगदी उठावदार करायचा असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची सुंदर ज्वेलरी घालायची असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या, डोंबिवलीतील केळकर रोडवरील 'सेनोरिटा'ला भेट द्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ब्रायडल चोकर सेट पासून ते इमिटेशन ज्वेलरीपर्यंत सगळं एकाच ठिकाणी, डोबिंवलीतील हे शॉप एकदम बेस्ट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement