रविवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर निवडणूक हालचालींना प्रचंड वेग आला होता. उमेदवारीचा अधिकृत एबी फॉर्म घेण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी मातोश्रीवर पाहायला मिळाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः प्रत्येक उमेदवाराची भेट घेत एबी फॉर्म वितरित करत होते, त्यामुळे संपूर्ण वातावरणात राजकीय हालचालींना वेग आला होता.
>> ठाकरे गटाकडून कोणाला मिळाली उमेदवारी?
advertisement
प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६० - मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ - सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ - झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ - देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ - सबा हारून खान
प्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्रमांक ९३ - रोहिणी कांबळे
प्रभाग क्र. १०० - साधना वरस्कर
प्रभाग क्र. १५६ - संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ - साईनाथ साधू कटके
प्रभाग क्र. १६८ - सुधीर खातू वार्ड
प्रभाग क्र. १२४ - सकीना शेख
प्रभाग क्र. १२७ - स्वरूपा पाटील
प्रभाग क्र- ८९- गितेश राऊत
प्रभाग क्र- १४१ - विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र - १४२ - सुनंदा लोकरे
प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग १६७ - सुवर्णा मोरे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र ९५ - चंद्रशेखर वायंगणकर
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक
> आज सगळ्याच उमेदवारांची यादी जाहीर होणार?
काल रात्री 'मातोश्री'वर अनेकांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना आज एबी फॉर्म वाटले जाणार असल्याची माहिती आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवार जाहीर केले जात आहेत. एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांकडून आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात संबोधित करणार आहेत.
