डेटिंग ॲपवरून भेट आणि 'प्रँक' लग्न
फेडरल सर्किट अँड फॅमिली कोर्टाने प्रकाशित केलेल्या कागदपत्रानुसार, ऑस्ट्रेलियातील एक मुलगी डेटिंग ॲपद्वारे एका मुलाला भेटली. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते पण त्या मुलीला कल्पना नव्हती की, त्यांचे लग्न तिच्या नकळत होईल. हे जाणून तिला धक्का बसला. परिस्थिती अशी झाली की, तिला कोर्टात जावे लागले.
मुलीला माहीतही नव्हते आणि लग्न झाले!
advertisement
हे जोडपे टिंडर या डेटिंग ॲपवर भेटले होते, ज्यात मुलगी 30 वर्षांखालील आणि मुलगा 30 वर्षांवरील होता. मेलबर्नच्या या जोडप्याने सिडनीला सुट्टीसाठी जाण्याचा बेत आखला. इथे पोहोचल्यावर मुलाने तिला प्रपोज केले आणि दोन दिवसांनी तिला एका 'ऑल व्हाईट पार्टी' मध्ये बोलावले, जिथे सगळे पांढरे कपडे घालणार होते. मुलगी याआधी अशा थीम पार्टीत गेली असल्याने ती इथेही पोहोचली. तिने लग्नाचा ड्रेस घातला नव्हता पण तिच्याशिवाय तिथे कोणीही पांढरे कपडे घातलेले नव्हते. जेव्हा मुलीने याबद्दल विचारले, तेव्हा बॉयफ्रेंडने तिला सांगितले की तो एक 'प्रँक वेडिंग' आयोजित करत आहे, जेणेकरून त्याच्या इंस्टाग्राम पेजवरील फॉलोअर्स वाढतील. मुलीचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि ती या 'प्रँक वेडिंग'चा भाग बनली.
'मी तुझा नवरा आहे, ये कागदपत्रात लिही'
जेव्हा मुलीला कळले की, तिचा बॉयफ्रेंड मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तेव्हा तिला धक्का बसला. त्याने मुलीला कागदपत्रात त्याचे नाव जोडण्यास भाग पाडले, कारण तो तिचा नवरा होता. घाबरलेल्या मुलीने ही केस घेऊन फॅमिली कोर्टात गेली. सुदैवाने, प्रपोजलच्या दोन दिवसांच्या आत लग्न होणे आणि मुलीकडील कोणीही सामील नसणे या आधारावर कोर्टाने हे लग्न रद्द केले, अन्यथा मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते.
हे ही वाचा : सीक लिव्ह घेतली तर कंपनी गुप्तहेर पाठवणार, कर्मचाऱ्यांसाठी फर्मान
हे ही वाचा : साप दिसताच माणूस आणि माकडे का घाबरतात? जपानच्या संशोधनातून रहस्य उघड...
