10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
अलीकडेच बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला होता. आता सगळ्यांचे लक्ष 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळं पदवी प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
advertisement
निकाल कुठे पाहायचा?
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://mahahsscboard.in
निकाल कसा पाहायचा?
- सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तिथे गेल्यावर 'SSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
- समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
- त्यानंतर 'Submit' बटणवर क्लिक करा
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा रिजल्ट दिसेल, तिथून तुम्हाला निकालाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करता येईल. किंवा तुम्ही स्क्रीन शॉटही काढू शकता.