बीजापूर भागात मंगळवारी सुरक्षा दल, पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीदरम्यान आतापर्यंतचा एकूण आकडा हाती आला आहे. जवानांनी तेरा माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. या वर्षभरतील ही माओवाद विरोधी अभियानातली सर्वात मोठी कारवाई आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडकारण्यात माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करून निवडणुकीत घातपात करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या माओवाद्यांना सुरक्षा दलानी मोठा हादरा दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या हालचाली सुरू झाल्या, त्याची कुणकुण सुरक्षा दलाल होतीच, या ठिकाणी माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे बॅनर लावले असून काही ठिकाणी माओवाद्यांनी पत्रके ही जारी केली आहेत.
advertisement
माओवाद्यांच्या विरोधात दंडकारण्यात छत्तीसगड गडचिरोली ओडिशा तेलंगाना पोलीसकडून अभियान राबविण्यात असून या अभियानात यश मिळालं आहे. बस्तरमध्ये माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या.सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे चारही जिल्हे माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया असलेले कार्यक्षेत्र असून विजापूर आणि नारायणपूर हे दोन जिल्हे गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत.
विजापूर जिल्ह्यात गंगलुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरचोलीच्या जंगलात माओवाद्यांचा मोठ्या कॅम्प असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी विजापूर पोलीस बस्तर फायटर्स सीआरपीएफ यांचा एक संयुक्त अभियान या भागात राबवलं होतं. घनदाट जंगलात काल सकाळी माओवाद्यांना घेरण्यात आलं. दोन्ही बाजूनं तुफान गोळीबार सुरू झाला. तब्बल दहा तास संध्याकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.
सकाळी चार माओवद्यांचे मृतदेह हाती लागले होते त्यानंतर सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली यात माओवाद्यांना मोठा धक्का बसला असून रात्री उशिरापर्यंत दहा माओवादी ठार झाले होते. त्यांचे मृतदेह शोध मोहिमेत हाती लागले. रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी सुरक्षा दल जंगलातच शोध मोहीम राबवत होती. बुधवारी सकाळी राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत आणखी तीन माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून मृतक माओवाद्यांची संख्या 13 झाली आहे. घटनास्थळावर शोध मोहिमेदरम्यान जवानांना त्यांच्याकडून इन्सास, एलएमजी है अत्याधुनिक शस्त्र सापडले आहेत. यासह AK-47 सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
गंगलुरच्या जंगलात मंगळवारी सकाळपासून ही चकमक सुरू होती. रात्री पर्यंत सर्चींग ऑपरेशन सुरू होते, छत्तीसगडच्या बस्तर विभागात माओवाद्यांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या माओवाद विरोधी अभियानातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानलं जातं. या चकमकीत अनेक माओवादी जखमी झाल्याचा दावा केला आहे.
या चकमकीत ठार झालेल्या सर्व माओवाद्यांचे मृतदेह जवानांनी बाहेर काढले असून ते विजापूर मुख्यालयात आणले जात आहेत. मारले*माओवाद्यांची ओळख अद्याप पटली नसली तरी लाखो रुपये बक्षीस असलेले सर्व माओवादी हे माओवादी संघटनेच्या PLGA प्लाटून क्रमांक 2 चे सदस्य असण्याची शक्यता असून ज्या पद्धतीने अत्याधुनिक शास्त्रे सापडले आहेत. ते पाहता माओवाद्यांचा मोठा नेता त्या मृतकांमध्ये असण्याची शक्यता आहे मारले गेलेल्या काही माओवाद्यांवर लाखो रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
दहा दिवसांपूर्वीच गडचिरोली पोलिसांनी तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्यात घुसलेल्या तीन माओवाद्यांना ठार केलं होतं त्यानंतर माओवाद्यांच्या विरोधात दंडकारण्यात आक्रमक कारवाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे...