TRENDING:

Kolhapur: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग, 20 प्रभाग केले जाहीर, विरोधकांचा जोरदार विरोध

Last Updated:

कोल्हापूरमध्ये महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. २० प्रभाग महापालिकेनं जाहीर केले आहे. पण विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कोल्हापूर : स्थानिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वारे वाहू लागले आहे. अशातच कोल्हापूरमध्ये महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. २० प्रभाग महापालिकेनं जाहीर केले आहे. पण, महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेच्या वतीने आता २० प्रभाग रचना जाहीर केली आहे. या २० प्रभागामध्ये हे वाटप करण्यात आलं आहे.  पहिल्यांदाच चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना केली आहे. यामध्ये २० नंबरचा प्रभाग हा पाच नगरसेवकांचा असणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचना पाहायला उपलब्ध झाली आहे.

advertisement

काँग्रेस भाजप आमने सामने

पण,कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधक सामने सामने आले आहेत. काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा आरोप करत त्याला तीव्र आक्षेप घेण्याचा इशारा दिलाय तर भाजपने विरोधकांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांचे रडगाणे सुरू असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा पलटवार केला. सत्ताधारी गटाने आपल्या सोयीची प्रभाग रचना केली आहे.  ३२ हजार मतदार असलेला २० नंबरच्या प्रभागात ५ नगरसेवक असणार आहे. तर  २७ ते २८ मतदारांचा एक प्रभाग केला आहे. त्यामुळे विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेच्या मुद्यावरून पालिकेत वाद पेटण्याची चिन्ह आहे.

advertisement

कोल्हापूर महापालिकेचा आखाडा

मागील १० वर्षांपासून कोल्हापूर पालिकेची निवडणूक रखडलेली आहे. कोल्हापूर महापालिकेची शेवटची निवडणूक ही नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP): ३२ जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) : २७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) : १५ जागा, शिवसेना (SS): ४ जागा

advertisement

आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या होत्या.  या निवडणुकीनंतर, भाजप आणि काँग्रेस यांच्या आघाडीतून सत्ता स्थापन झाली होती. पण मध्यल्या कोरोनाच्या काळात निवडणूक प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे आतापर्यंत नवीन निवडणुका झालेल्या नाहीत आणि महापालिकेचा कार्यकाळ पूर्ण होऊन प्रशासक नेमला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग, 20 प्रभाग केले जाहीर, विरोधकांचा जोरदार विरोध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल