मुंबईमध्ये जसा महाकाय गणपती बसवण्याचा ट्रेंड आहे तोच ट्रेंड यावर्षी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिसून येत आहे. सर्व मंडळं आपापसामध्ये स्पर्धा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी शहरात 11 फूट उंचीच्या 14 गणेश मूर्तींची स्थापना होणार आहे. त्यापैकी चार मूर्ती खास मुंबईतून संभाजीनगर शहरात आणल्या आहेत.
advertisement
तीन गणेश मंडळांमध्ये 21 फुटांच्या मूर्ती
1) शहरात यंदा दिवाण देवडी येथील पावन गणेश मंडळाच्या मंडपात 21 फूट उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे. ही मूर्ती शहरातील मूर्तिकार दिनेश बगले यांनी तयार केली आहे.
2) शिवाजीनगरमध्ये राजा जिजामाता 3 गणेश मित्रमंडळाने 21 फूट उंचीची मूर्ती आणली आहे. गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या मूर्तीचं आगमन झाले. मूर्तिकार मेघराज शेळके यांनी ही मूर्ती साकारली आहे.
3) सिडको एन-८ येथील मार्तड गणेश मंडळाने मुंबईहून 21 फूट उंचीची 'चिंचपोकळीचा राजा'ची स्वरुपातील मूर्ती आणली. रविवारी संध्याकील भव्य मिरवणुकीत या मूर्तीचं आगमन झालं.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जागृत हनुमान गणेश मंडळ 17 फूट उंचीची मूर्ती स्थापन करणार आहेत. अष्टविनायक गणेश मंडळ जाधव मंडी आणि मोरया सार्वजनिक गणेश मंडळ विवेकानंद नगर याठिकाणी 16 फूट मूर्ती स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय, देवडीचा राजा, नवाबपुरा, जयहिंद ग्रुप, एन 12 हडको, श्री साई सेवा गणेश मंडळ, सिंधी कॉलनी, शहीद भगतसिंग मित्र मंडळ, जवाहर कॉलनी या सर्व मंडळांमध्ये 15 फूट मूर्ती स्थापन होणार आहेत. मुद्रा गणेश मंडळ सिडको एन 8 हे मंडळ 14 फूट, शिव गणेश मंडळ कुवारपल्ली 13 फूट, महाकाल प्रतिष्ठान नागेश्वर वाडी 13 फूट आणि बाल कन्हैया गणेश मंडळ धावणी मोहल्ला 11 फूट उंचीच्या मूर्तींची स्थापन करणार आहेत.






