मुंबईसह ठाण्यामध्ये कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरायला लागला आहे. ठाणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात शनिवारी एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती.
मुंब्रा येथे राहणारा वसीम सय्यद (वय 21) हा तरुण मधुमेह आजाराने त्रस्त होता. त्याच्या रक्तातील साखर नियंत्रित होत नसल्यानं त्याला त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असता कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वसीम सय्यदला गुरुवारी कळवा रुग्णालयात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती चिंताजनक झाली. अखेरीस शनिवार २४ मे रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
advertisement
तर कळवा रुग्णालयात कोरोना कक्षात आणखी एक गर्भवती महिला कोरोनाची लागण झाली असून उपचार सुरू आहे. या महिलेच्या अंगातील ताप कमी झाला असून तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहे. या महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता प्रकाश बोरुडे यांनी दिली.