मिळालेल्याा माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावात ही घटना घडला आहे. आकाश अरुण वेद्रे (वय २३) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या आनंदात रमलेल्या वातावरणावर अचानक दुःखाची सावली पसरली आहे.
दिवसभर शिमगा पालखीत सहभाग
advertisement
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात पारंपरिक सोहळ्यांना उत्साहाचं वातावरण होतं. आकाश वेद्रे हा दिवसभर शिमगा पालखी सोहळ्यात सक्रिय सहभागी झाला होता. मित्रांसोबत पारंपरिक खेळ, पालखीचा फेरफटका आणि उत्सवातील विविध कार्यक्रमात तो आनंदाने सहभागी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. रात्री उशिरापर्यंत तो पालखी सोहळ्यात दिसत होता. मात्र मध्यरात्रीनंतर घरी परतल्यानंतर आकाशने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी आकाशला आवाज दिला पण तो बराच वेळ झाला रूममधून बाहेर आला नाही. त्यामुळे रूममध्ये डोकावून पाहिले असता आकाशने गळफास घेतल्याचं लक्षात आलं. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडलं असून दाभोळ गावात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश वेद्रे या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध पोलीस घेत आहेत.
