सातारा : कोरोनातून सावरल्यानंतर सर्वसामान्यांचं आयुष्य रुळावर आलं आहे. पण आता मागील काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) नावाच्या आजाराने थैमान घातलं आहे. आता पुण्यापाठोपाठ साताऱ्यातही जीबीएस आजाराने एंट्री केली आहे. सातारा जिल्ह्यात GBS चे 4 संशयित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आरोग यंत्रणा अलर्ट झाली आहे.
साताऱ्यात आता गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS)ने एंट्री केली आहे. जिल्ह्यात ४ जीबीएसबाधीत रुग्ण आढळली आहे. 15 वर्षाच्या आतील 4 मुलांवर उपचार उपचार सुरू आहे. साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात 2, खाजगी रुग्णालयात 1 आणि कराडच्या कृष्णा रुग्णालयात 1 रुग्णावर उपचार सुरू आहे. चारही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हे चार मुलं जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आहे. या मुलांची चाचणी घेण्यात आली असून प्रयोग शाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर GBS चे निदान स्पष्ट होणार आहे.
advertisement
दरम्यान, अचानक हातपाय लुळे पडले, असतील तर शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी केलं आहे.
पुण्यातील विहीर संशयाच्या भोवऱ्यात
दरम्यान, पुण्यातील नांदेड गावातली पाणीपुरवठा विहीर राजकारण्यांसाठी जणू टुरिस्ट स्पॉट्सच बनून गेलाय. रोज या विहिरीवर कोणीना कोणी पाहणी करायला येतं आहे. गुरूवारीही खासदार सुप्रिया सुळे इकडे भेट देऊन गेल्या, तसंच त्यांनी विहिरीतले वॉटर सॅम्पलही पाहिले आणि पालिका अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. तसंच सुप्रिया सुळे यांनी जीबीएस रूग्णांची महागडी हॉस्पिटल बिलं सरसकट माफ करण्याची मागणी केली.
एकाच परिसरात 73 रुग्ण
थोडक्यात कायतर दुर्मिळ म्हणवल्या जाणाऱ्या महाभयंकर जीबीएस रोगाची साथ काही केल्या आटोक्यात येताना दिसत नाही. पुणे महापालिकेला अजूनही रोगाचं मूळ उगमस्थानच सापडत नाही. अनेकांना या विहिरीतूनच दुषित पाणीपुरवठा झाल्याचा संशय आहे, कारण या परिसरात तब्बल 73 रूग्ण सापडलेत. पण पालिका अधिकारी हे मान्यच करायला तयार नाहीत. थोडक्यात काय तर 14 जानेवारीपासून फैलावलेली पुण्यातली जीबीएसची साथ 15 दिवसांनंतरही आटोक्यात येताना दिसत नाहीये.
