TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्या कनकची मोठी भरारी! वयाच्या 5व्या वर्षी केले तब्बल 6 विक्रम, बघा VIDEO

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: कनकला वैज्ञानिक शोधांबद्दल फार आकर्षण आहे. ती नेहमी शोध आणि त्यामागील शास्त्रज्ञांची नावं जाणून घेण्यास उत्सुक असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 5 वर्षांच्या चिमुकलीने नुकताच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे हा तिचा पाच वर्षांतील सहावा रेकॉर्ड आहे. तिने 1 मिनिट 50 सेकंदामध्ये 50 शास्त्रज्ञांची नावं ओळखलेली आहेत. कनक मुंदडा असं या मुलीचं नाव असून तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement

कनक मुंदडा ही ‎छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात राहते. मे महिन्यामध्ये या रेकॉर्डसाठी तिच्या पालकांनी अप्लाय केलं होतं. जुलै महिन्यामध्ये तिच्या नावे रेकॉर्ड झाला. कनकच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कनकला वैज्ञानिक शोधांबद्दल फार आकर्षण आहे. ती नेहमी शोध आणि त्यामागील शास्त्रज्ञांची नावं जाणून घेण्यास उत्सुक असते. म्हणून पालकांनी तिला शास्त्रज्ञांची नावं शिकायला सुरुवात केली. तल्लख बुद्धीच्या कनकने शिकवलेली सर्व नावं लक्षात ठेवली. आता तिने 1 मिनिट 50 सेकंदात 50 शास्त्रज्ञांची नावं सांगितली आहेत.

advertisement

कनकचे वडील म्हणाले,‎ "एक वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान आहे. तिच्या यशामध्ये कनकची आई आणि भाऊ रणक यांचा मोठा वाटा आहे. रोज रात्री कनकचा भाऊ तिची प्रॅक्टिस घेत होता. आम्ही कनकला अजिबात मोबाईल देत नाही. टीव्ही देखील शनिवार आणि रविवारीच बघायला मिळते. इतर दिवस आमची मुलं पुस्तकं आणि बाहेर जाऊन खेळण्यात रमतात. इतर पालकांनी देखील मुलांना डिजिटल गोष्टींपासून दूर ठेवावं असा सल्ला मी देईल."

advertisement

‎कनकने आतापर्यंत केलेले रेकॉर्ड

‎वय 18 महिने : देशांचे झेंडे, स्वातंत्र्यसैनिक, फळे-भाज्या व प्राणी यांची ओळख - कलाम वर्ल्ड रेकॉर्ड्स

‎वय 20 महिने : इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 'Super Talented Kid' म्हणून मान्यता

‎‎वय 2.5 वर्षे : 22 अंतर्गत अवयवांची नावे फक्त 40 सेकंदात - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

advertisement

‎‎वय 2 वर्षे 10 महिने : 29 राज्यांच्या राजधान्यांची नावे 52 सेकंदात - ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स

‎‎वय 3 वर्षे : 65 देशांच्या राजधान्यांची नावे 1 मिनिट 50 सेकंदात - वर्ल्डवाईट बुक ऑफ रेकॉर्ड्स

वय 4 वर्षे 11 महिने : 50 शास्त्रज्ञांची नावे 1 मिनिट 50 सेकंदात - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्या कनकची मोठी भरारी! वयाच्या 5व्या वर्षी केले तब्बल 6 विक्रम, बघा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल