TRENDING:

हृदयद्रावक! साताऱ्यात मतदानाचा हक्क बजावतना वयोवृद्ध मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Last Updated:

साताऱ्यातून (Satara)  एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान करताना मतदानकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election)  रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः अनेक मतदार दुपारी वाढत असलेले तापमान पाहता सकाळच्या सत्रात मतदान उरकण्यावर भर देताना पाहायला मिळत होते. अशात साताऱ्यातून (Satara)  एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान करताना मतदानकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावतानाच मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शाम धायगुडे असे मतदानकर्त्याचे नाव आहे. धायगुडे 67 वर्षाचे होते . मतदान करतानाच अचानक चक्कर आल्याने जागेवरच कोसळले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले.

advertisement

परिसरात हळहळ 

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील दुपारी 3 पर्यंतची टक्केवारी - 49.82 टक्के मतदान

1) फलटण - 48.41

2) वाई - 48.19

advertisement

3) कोरेगाव - 53.86

4) माण- 45.01

5) कराड उत्तर - 52.03

6) कराड दक्षिण - 52.56

7) पाटण - 51.59

8) सातारा - 47.96

बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीड मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत होते आणि आज मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला आहे.

advertisement

नंदुरबारात 84 वर्षीय वयोवृद्ध  आजीने रुग्णवाहिकेतून  मतदानाचा हक्क

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

नंदुरबार शहरातल्या अमर टॉकीज शेजारच्या नगरपालिकेचे शाळेचे एका 84 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा चक्क रुग्णवाहिकेतून आणून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. दयावती बिपिनचंद्र देसाई असा या रुग्ण महिलेचे नाव असून या महिलेला अर्धांगवायू झाला आहे. त्यामुळे त्या बेडवरच आहे. गृह मतदानाचा त्यांचा फॉर्म भरल्याने गेल्याने त्यांचं गृह मतदान होऊ शकलो नव्हतं मात्र त्यांची मतदानाची प्रबळ इच्छा असल्याने त्यांच्या मुलाने रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मतदान केंद्रात आणून मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. दयावती देसाई यांनी स्ट्रेचरवरूनच मतदान केलं आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हृदयद्रावक! साताऱ्यात मतदानाचा हक्क बजावतना वयोवृद्ध मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल