सुमारे 200 ते 250 वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पुण्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. देवीचा स्पटीक पिवळ्या रंगाचा असल्यामुळे या देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ असे नाव मिळाले. मंदिराबद्दल एक वेगळी धार्मिक मान्यता आहे. ज्या मुला-मुलींच्या विवाहात अडथळे येतात त्यांनी देवीला पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात, असे सांगितले जाते. असं केल्याने त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन लवकरच विवाह ठरतो, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
advertisement
दिवाळीत तुमचं घर चमकवतील हे 7 घरगुती उपाय! सहज होईल साफसफाई
देवीची मूर्ती अष्टभुजा स्वरूपात असून देवींची तीन रूपे म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी आहेत. विशेष म्हणजे मूर्ती तांदळाच्या स्वरूपात देखील दर्शविली जाते. नवरात्रीच्या काळात देवीला नऊ स्वरूपांमध्ये सजविले जाते आणि रोज वेगवेगळ्या रूपात दर्शन घडते. यामुळे भक्तांना दररोज नव्या रूपात दर्शन घेण्याचा अनुभव मिळतो.
पुण्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये पिवळी जोगेश्वरी महत्त्वाचे स्थान आहे. काळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, तांबडी जोगेश्वरी आणि चतुरश्रुंगी या देवस्थानांचा समावेश या शक्तीपीठांमध्ये होतो. सर्व शक्तीपीठांना भेट देणे प्रत्येकाला शक्य नसल्याने भक्तांना पिवळी जोगेश्वरी मंदिर हे एक प्रमुख पर्याय ठरते.
परदेशी पर्यटनात भारत अव्वल, कोणत्या देशात पर्यटकांची गर्दी ?
नवरात्रीच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात. दिवसभर मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण पाहिला मिळते.
मंदिराचे पुजारी दिनेश कुलकर्णी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे. भाविकांच्या श्रद्धेमुळे मंदिराचे महत्त्व वाढत असून पिढ्यांपिढ्या या परंपरेचे जतन केले जाते. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांचे दर्शन भक्तांसाठी खास असते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील पिवळी जोगेश्वरी मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाने उजळून निघाले असून, देवीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने पुण्याकडे धाव घेत आहेत.