प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष
महालक्ष्मी एक्स्प्रेस ही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. ही गाडी रोज रात्री ८.५० वाजता कोल्हापूरहून निघते आणि प्रवाशांकडून तिला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. वर्षभर या गाडीचे तिकीट ‘प्रतीक्षा यादी’ (waiting list) मध्ये असते. अशा परिस्थितीत डबे वाढवण्याऐवजी ते कमी करण्याचा निर्णय अत्यंत संतापजनक असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या रेल्वेला यापूर्वी जादा एलएचबी कोच जोडले होते, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत होता. पण आता हा नवीन निर्णय प्रवाशांची गैरसोय करणारा आहे.
advertisement
प्रवासी संघटनांची मागणी
कोल्हापूर-सांगली रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सदस्य उदयसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, “महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढवण्याची मागणी असताना, आता तीन आरक्षित डबे कमी करणे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल.”
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य सुहास गुरव यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाणारी ही एकमेव थेट रेल्वे आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांनी प्रशासनाकडे आणखी दोन आरक्षित स्लीपर डबे वाढवण्याची मागणी केली आहे, तसेच पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे.
हे ही वाचा : Bhide Bridge Closed : पुणेकरांनो महत्त्वाची बातमी! भिडे पूल 'इतक्या' दिवस वाहतुकीसाठी बंद; नेमकं काय आहे कारण?
हे ही वाचा : भावा, हे कोल्हापूर हाय! मिरवणुकीत चप्पल तुटली, तरीही पोरं नाचली; मनपा 'त्या' 10 ट्राॅली चपलांचं करणार काय?