पुणे जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने उघडीप घेतली आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शून्य मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30.4 अंश सेल्सिअस होते. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील 4 दिवसासाठी सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर, बुलढाण्यात आज आणि उद्या दोन दिवस विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात पुन्हा दोन दिवस 19 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढू शकतो, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. बीड, लातूर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानाशी संबंधित अधिकृत अपडेट्ससाठी नागरिकांनी IMD च्या अधिकृत संकेतस्थळावरून या संदर्भातील माहिती घेत राहावी.