राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी दहिसरमध्ये रस्त्यांवर बॅनर लावले आहेत. दहिसर पूर्व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहिसर तालुकाध्यक्ष ममता शर्मा यांनी हे बॅनर लावले होते. त्या बॅनरवर यंदा गणरायाच्या चरणी एक प्रार्थना आपकी बार अजितदादा पवार "मुख्यमंत्री" असे लिहिले आहे.
लोकसभेला मुस्लिम समाजाचं भरभरून मतदान, ठाकरे विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार?
advertisement
या बॅनर्समुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. महायुतीमध्ये आधीच जागांवरुन चढाओढ सुरू आहे. महायुतीसमोर पुन्हा एकदा जागा निवडणून आणण्याचं मोठं आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जागांवर मोठा फटका बसला होता. मात्र लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीला तारणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Shivsena Uddhav Thackeray : '...तर आमची 288 जागांवर लढायची तयारी', ठाकरेंच्या शिवसेनेचा मविआला इशारा
महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून बॅनरबाजी केली जात आहे. तर आता दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी बॅनरबाजी करुन आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्रीपदावरुन बॅनरवॉर रंगणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.