याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक सोमनाथ भागोजी भावले (वय 52, राहणार वसंत विहार बीड बायपास) आणि संगणक ऑपरेटर गणेश रामनाथ कोथिंबीरे (वय 26, राहणार सातारा गाव) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार शिक्षिकेने मुख्याध्यापक सोमनाथ भावले याच्याकडे अर्जित रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, रजा मंजूर करण्यासाठी भावले याने ऑपरेटर गणेश कोथिंबीरेच्या माध्यमातून शिक्षिकेकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शिक्षिकेने एसीबीकडे तक्रार केली.
advertisement
एसीबीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्यानुसार शिक्षकीने ऑपरेटर गणेश कोथिंबीरे याच्याकडे 20 हजार रुपये दिले. एसीबीने सांगितल्यानुसार, पैसे देताच शिक्षिकेने ओढणी झटकून पथकाला इशारा दिला. त्याचवेळी पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडलं. त्यांच्याकडून 20 हजार रुपये आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अधीक्षक माधुरी कांगणे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या पथकातील जमादार सचिन बारसे यांनी केली. या प्रकरणी सातारा गाव पोलीस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.