गेवराई तालुक्यातील उमापूर इथे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मेहुण्याचे लग्न लावून घरी परत निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाइकचा भीषण अपघात झाला. धुळे सोलापूर मार्गावर कंटेनरने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात पती पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाले.
महेश ढवळे यांचं लग्न लावून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना कंटेनरने जोरदार धडक दिली. बीडच्या दिशेकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकींना चिरडलं. ही धडक इतकी भीषण होती बाईकवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. विकास जाधव, साक्षी विकास जाधव आणि अथर्व विकास जाधव या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. कंटेनरने धडक दिल्यानंतर 50 फुटापर्यंत फरफटत नेलं. यामध्ये तिघे कंटेनरखाली दबले गेले.
advertisement
जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करुन तिघांचे मृतदेह बाजूला काढावे लागले. दुसरी दुचाकी कडेला फेकली गेली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. धुळे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.