श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा-दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून श्रीरामपूर पोलीस पथकाने सापळा रचत एक संशयित टॅम्पो अडवला. पोलिसांची ही शंका खरी ठरली.
या वाहनातून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला अल्प्राझोलम नामक पदार्थाच्या २१ गोण्या जप्त केल्या. या कारवाईत ७० किलो वजनाच्या तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय..
advertisement
नेमकं प्रकरण काय, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला काय म्हणाले?
काल संध्याकाळी आपल्याला अशी माहिती मिळाली की, श्रीरामपूरच्या आद्यौगिक वसाहतीत अमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. छोटा हत्ती टेम्पोमध्ये २१ गोण्या अमली पदार्थाचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. एका आरोपीला अटकही करण्यात आले आहे. पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवपुजे करीत आहेत, अशी माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.
