TRENDING:

Dharashiv News : मित्राने दिलेला सल्ला ऐकला अन् सुरू केला फुटवेअरचा व्यवसाय, आता महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, VIDEO

Last Updated:

business success story - जिद्द असली की आपण कोणताही व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वी करुन दाखवु शकतो, हे बालाजी यांनी दाखवून दिले आहे. आपल्या कामातून त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

अहमदनगर - नोकरीच्या मागे न लागता मित्राने दिलेला सल्ला ऐकत 21 व्या वर्षी तरुणाने व्यवसायाला सुरुवात केली. अवघ्या 4 वर्षात या व्यवसायाची भरभराट झाली आहे. हा तरुण नेमका कोण आहे, त्यांनी नेमका कसला व्यवसाय सुरू केला, याबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.

धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बालाजी गोलेकर हे 4 वर्षांपूर्वी एका मित्राच्या फुटवेअरच्या दुकानात जात होते. दरम्यान फुटवेअरच्या व्यवसायातील बारकावे त्यांनी यावेळी पाहिले. तसेच मित्रासोबत चर्चा केली आणि मित्राने त्यांना व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला.

advertisement

त्यावर व्यवसायतील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांनी अगदी काही काळ कामही केले आणि त्यानंतर फुट वेअरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बालाजी गोलेकर यांनी अवघ्या 21 व्या वर्षी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करत 2020 मध्ये त्यांनी खर्डा शहरातील मेन रोडवर फुटवेअरच्या व्यवसायाला सुरुवात केली.

तसेच भाऊ प्रवीणच्या मदतीने बालाजी यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. सध्या या व्यवसायाला चार वर्ष पूर्ण होत आहेत. या व्यवसायाची भरभराट झाली असून दिवसाकाठी याठिकाणी 4 ते 5 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे. खरंतर वयाच्या 25 व्या वर्षी बालाजी यांनी यशस्वीपणे व्यवसायाची भरभराट केली आहे.

advertisement

रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO

अनेक तरुण नोकरीच्या पाठीमागे धावत आहेत. त्यामध्ये, नोकरीच्या पाठीमागे न धावता कुठेतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर आपण उभा राहू शकतो, चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येईल, असा कोणताही व्यवसाय आपण करू शकतो, असे यावेळी बालाजी गोलेकर यांनी सांगितले.

advertisement

जिद्द असली की आपण कोणताही व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वी करुन दाखवु शकतो, हे बालाजी यांनी दाखवून दिले आहे. आपल्या कामातून त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Dharashiv News : मित्राने दिलेला सल्ला ऐकला अन् सुरू केला फुटवेअरचा व्यवसाय, आता महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल