आता या सर्व पार्श्वभूमीवर सपा नेते अबू आझमी हे आज गुहा गावाला भेट देणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आझमी यांना ग्रामस्थांनी विरोध केला आहे. गावात वातावरण शांत असताना आझमी यांनी येवून वाद वाढू नये, असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. गावच्या वेशीवर गावकरी एकवटले आहेत. पोलिसांनी देखील आझमी यांना न येण्याची विनंती केली आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही आझमी हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं गावात तणाव वाढण्याची शक्यता आहे. आझमी गुहा गावाकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी संगमनेरमध्येच आडवलं आहे. गावात न जाण्याची विनंती त्यांना करण्यात येत आहे.
advertisement
काय आहे नेमका वाद?
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिराचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुस्लिम समाजाकडून दर्गा असल्याचा दावा केला जात आहे, तर हिंदू समाजाकडून कानिफनाथ मंदिर म्हणून अनेक वर्षांपासून इथे पूजा केली जात आहे. वाद न्यायालयात सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी इथे जोरदार राडा झाला होता.
