TRENDING:

Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भयंकर अपघात, कारवर कोसळला आयशर टेम्पो; कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Last Updated:

पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करीत असताना अचानक सदरचा टेम्पो त्या कारवर कोसळल्याची घटना रात्री 8च्या सुमारास घडलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिष दिमोटे, अहमदनगर, 18 डिसेंबर :  संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारवर कोसळल्याने कार मधील चौघांचा मृत्यू झाला. मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
News18
News18
advertisement

पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करीत असताना अचानक सदरचा टेम्पो त्या कारवर कोसळल्याची घटना रात्री 8च्या सुमारास घडलीय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात टोयोटा कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चकनाचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे एका महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात बळी गेलाय.

advertisement

Accident News : नगर-कल्याण हायवेवर तिहेरी अपघात, दोन मुलांसह एक कुटुंब जाग्यावर संपलं, तब्बल 10 जणांचा मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

अपघातात ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व या.अकोले) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. यावेळी नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भयंकर अपघात, कारवर कोसळला आयशर टेम्पो; कुटुंबातील चौघांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल